घरताज्या घडामोडीतालिबान्यांची क्रूरता, अमेरिकेचे खबरी ठरवून ३ ते ४ लाख लोकांना मारणार?

तालिबान्यांची क्रूरता, अमेरिकेचे खबरी ठरवून ३ ते ४ लाख लोकांना मारणार?

Subscribe

१९७८ मध्ये तालिबान्यांनी क्रूरता दाखवली होती तशीच आताही दाखवू शकतात

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अफगाणिस्तानमधील नाटो देश आणि अमेरिकेसह इतर मित्र देशांच्या सैनिकांना मदत करणाऱ्या अशा ३ ते ४ लाख लोकांना खबरी म्हणून मारतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा करताना देशातील सर्व एक्झीट पॉइंट ताब्यात घेतल्यामुळे या नागरिकांना पळून जाण्याचा मार्ग नाही. यामुळे तालिबान्यांच्या शत्रूंना मदत करणाऱ्या लोकांना किती क्रूरतेने मारण्यात येईल याची त्या लोकांना कल्पना नाही. अशी प्रतिक्रिया निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी दिली आहे. तालिबानमध्ये २० वर्षांपुर्वीची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तालिबानमधील परिस्थितीबद्दल भीती व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या भीषण परिस्थिती आहे. गेल्या २० वर्षांपपासून अफगाणिस्तान तालिबान्यांच्या कचाट्यातून बाहेर होते. मात्र आता तालिबानच्या ताब्यात गेलं असल्यामुळे महिलांना त्यांचं स्वातंत्र्य जाण्याची भीती वाटत आहे. तालिबानी शरियत लावतील कारण २० वर्षांपुर्वी जे तालिबान्यांचे वागण होतं तेच आजही आहे.

- Advertisement -

अफगाणिस्तानमधील काही लोकं अमेरिका आणि नोटाच्या सैन्याला मदत करत होते. या लोकांची संख्या ३ ते ४ लाखांच्या आसपास आहे. या लोकांना तालिबानी खबरे म्हणून मारतील अशी शक्यता आहे. अमेरिकेला मदत करणाऱ्या लोकांसाठी अमेरिकेनं काही केलं नाही. या लोकांची अमेरिकेनं मदत न करता तालिबान्यांच्या तोंडाशी दिलं आहे. यामुळे या नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असेल. नागरिक एका शहरातून दुसऱ्या शहरात पळून जाऊ शकतात. अमेरिकेला मदत करणाऱ्या नागरिकांची माहिती तालिबानकडे आहे. यामुळे तालिबान्यांनी यापुर्वी जे केलं आहे तेच पुन्हा करण्याची शक्यता आहे. १९७८ मध्ये तालिबान्यांनी क्रूरता दाखवली होती तशीच आताही दाखवू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अफगाणिस्तानमध्ये नागरी हवाई वाहतूक बंद

तालिबान्यांनी काबूल ताब्यात घेतलं असल्यामुळे अफगाणिस्तानमधील सर्व नागरी हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे. आपल्या देशातील नागरिकांना पुन्हा आणण्यासाठी प्रत्येक देशाचे सैन्याचे विमान पाठवण्यात येत आहे. भारताकडूनही सैन्याचे विमान पाठवण्यात आलं होते. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी या देशांचे हेलिकॉप्टर्स अफगाणिस्तानला जात आहेत. तर भारताकडून सी-१७ विमान पाठवण्यात येत आहे. नागरिकांना स्थलांतरित करताना प्रथम प्राधान्य राजदूत आणि सरकारी कामगारांना, तंत्रज्ञ यांना देशातून बाहेर काढण्यात येईल. यानंतर सर्वसामान्यांना काढण्यात येईल अशी माहिती पटवर्धन यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भारत आमच्यासाठी मोठा भाऊ; अफगाणी विद्यार्थ्यांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -