Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र तुळजापुरात 10 वर्षांनंतर होतेय दागिन्यांचे मोजमाप, 200 किलो सोने जमल्याची चर्चा

तुळजापुरात 10 वर्षांनंतर होतेय दागिन्यांचे मोजमाप, 200 किलो सोने जमल्याची चर्चा

Subscribe

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळख असलेल्या तुळजापुरातील तुळजाभवानी माता मंदिरातील दागिन्यांच्या मोजमापाला आता सुरूवात करण्यात आलेली आहे. 10 वर्षांनंतर या दागिन्यांचे मोजमाप करहण्यात येत आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळख असलेल्या तुळजापुरातील तुळजाभवानी माता मंदिरात दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. दर्शनाला आलेले भाविक श्रद्धेने देवीला सोन्या चांदीचे दागिने देखील अर्पण करत असतात. याच दागिन्यांच्या मोजमापाला आता सुरूवात करण्यात आलेली आहे. 10 वर्षांनंतर या दागिन्यांचे मोजमाप करहण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या 10 वर्षांत तब्बल 200 किलो सोने, 04 हजार किलो चांदी जमा झाली असल्याची सांगण्यात येत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात दागिने जमा झाल्याने या सर्व दागिन्यांचे मोजमाप करण्यासाठी साधारणतः महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तर सोने वितळविण्याच्या प्रक्रियेत आरबीआयकडून मदत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – RuPay Prepaid Forex cards : परदेशात वापरता येणार, शॉपिंग करता येणार; RBI ची भेट

- Advertisement -

मंदिराच्या दर्शन मंडपातील चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये कडक सुरक्षेत हे काम सुरु करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी एक पेटी मोजणीसाठी आणली गेली. या पेटीत 720 पाकिटे होती. या दागिन्यांच्या मोजमापासाठी सगळीकडे सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी एक पेटी मोजदादसाठी आणली गेली होती. पेटीत 720 पाकिटे होती. त्यापैकी 105 पाकिटांतल्या सोन्याची मोजदाद करण्यात आली असून रोज सकाळी 10 ते सांयकाळी 6 या वेळेत मोजमाप करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रक्रियेसाठी लेखापाल सिध्देश्वर शिंदे यांनी सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक पदाचा चार्ज घेतला असून दैनंदिन देवीच्या पुजेसाठी वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या पंचवीस वस्तुंचे हस्तांतरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दुपारी प्रत्यक्ष एक पेटी आणुन त्यातील सोने मोजण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे. सोने मोजदाद प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत करण्यात येत आहे. या सोने मोजदादसाठी शासकीय परवाना धारक मुंबईचे सिध्दीविनायक मंदिराचे सोने मोजदाद करणारे पुरुषोत्तम काळे खास उपस्थितीत होते. ही प्रक्रिया दरम्यान मोजदाद करणाऱ्या मंडळीना खास वेश वापरण्यास देण्यात आलेला आहे. मोजदाद करणाऱ्यांना घालण्यासाठी जे कपडे देण्यात आलेले आहेत. त्या कपड्यांच्या शर्टाला आणि पँटला एकही खिसा देण्यात आलेला नाही.

- Advertisement -

येत्या काही वर्षात तुळजाभवानी मंदिरासाठी प्रशाद योजनेतून एक हजार कोटींचा नवा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिर्डी आणि तिरूपती बालाजी देवस्थानाप्रमाणे तुळजाभवानी मंदिरात देखील हायटेक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षात या मंदिरातील वाढती गर्दी पाहता सर्व सोयी सुविधा या मंदिरात भाविकांना मिळाव्यात, अशा पद्धतीने बदल करण्यात येणार आहे.

- Advertisment -