घरमहाराष्ट्रअखेर १५ वर्षांनंतर पटेल यांची व्हेरिकोज व्हेन्सपासून सुटका

अखेर १५ वर्षांनंतर पटेल यांची व्हेरिकोज व्हेन्सपासून सुटका

Subscribe

गेल्या १५ वर्षांपासून श्याम पटेल व्हेरिकोज व्हेन्सच्या त्रासापासून त्रस्त होते. अखेर मुंबईतील कोहिनूर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर पटेल यांनी या त्रासापासून सुटकेचा श्वास घेतला आहे.

गेली १५ वर्षे व्हेरिकोज व्हेन्सपासून कंटाळलेल्या श्याम पटेल यांची या आजारापासून सुटका करण्यात मुंबईतील कोहिनूर या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आले आहे. व्हेरिकोज व्हेन्समुळे पटेल यांना दैनंदिन कामे करणेही कठीण झाले होते. पण, कोहिनूर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर एण्डोव्हेनस लेसर उपचार (ईव्हीएलटी) केल्यानंतर आता त्यांना व्यवस्थित हालचाल करणे शक्य होत आहे. शिवाय, त्यांनी पुन्हा दुकानात काम करणेही सुरू केले आहे. श्याम पटेल हे व्यवसायाने दुकानदार आहेत. गेल्या १५ वर्षांपासून त्यांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होता. दिवसभर १३ तास काम केल्यानंतर रोज रात्री त्यांच्या पायाच्या पोटरीच्या भागात तीव्र वेदना व्हायच्या. पण, तरीही त्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले. मे २०१९ मध्ये दुकानात काम करत असताना त्यांच्या डाव्या पायातून रक्त वाहू लागले आणि अतिरक्तस्त्राव झाला. त्यांना जवळच्या जनरल फिजिशियनकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी बँडेजचा वापर करून रक्तस्राव थांबवला. त्यानंतर रुग्णाला कोहिनूर हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला.

हेही वाचा – राज्यात जलजन्य आजाराचं वाढतं प्रमाण; आजाराचा उद्रेक टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क

- Advertisement -

‘देशातील ३ पैकी १ जण या विकाराने ग्रासलेला’

याविषयी अधिक माहिती देताना कोहिनूर हॉस्पिटलमधील सल्लागार इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. अभिजित सोनी यांनी सांगितलं की, “त्वचेखाली सुजलेल्या आणि पीळ पडलेल्या शिरा किंवा रक्तवाहिन्या म्हणजेच व्हेरिकोज व्हेन्स. आपल्या देशात ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. ३ जणांपैकी १ जण या विकाराने ग्रासलेला आहे. दीर्घकाळ उभे राहणे आवश्यक असलेले काम करणाऱ्यांना म्हणजेच वाहतूक पोलिस, हवालदार आणि शिक्षकांना हा विकार होण्याची शक्यता अधिक असते. त्याचप्रमाणे हा अनुवंशिकही असू शकतो. यामुळे, पाय दुखतात तसेच अल्सरेशन होते. या रुग्णाला दीर्घकाळ उभे राहण्याच्या कामामुळे व्हेरिकोज व्हेन्सचा विकार जडला होता आणि त्याच्या डाव्या पायातून रक्तस्राव होत असल्याने त्याला चालता येत नव्हते.” डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, भारतात ३ पैकी १ व्यक्ती व्हेरिकोज व्हेन्स विकाराने ग्रस्त आहे. साध्या अल्ट्रासाउंड डॉपलर चाचणीच्या मदतीने वेळीच निदान होणेही महत्त्वाचे असते. पण, अनेकदा योग्य निदान होत नसल्याकारणाने या आजारावर मात करता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -