Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रSharad Pawar : 60 वर्षांनी काँग्रेस अन् शरद पवारांचा बालेकिल्ला ढासळला, उभारण्यासाठी...

Sharad Pawar : 60 वर्षांनी काँग्रेस अन् शरद पवारांचा बालेकिल्ला ढासळला, उभारण्यासाठी लागणार कस…

Subscribe

Congress And Sharad Pawar Ncp : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला रणनीती आखून उतरावं लागणार आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सातारा हा काँग्रेसला बालेकिल्ला बनविला. काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तरीही, सातारा शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहिला. पण, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवार यांचा बालेकिल्ला 60 वर्षांनी ढासळला आहे. बड्या-बड्या नेत्यांना पराभवाची धूळ चाखावी लागल्यानं एकही आमदार साताऱ्यात निवडून आला नाही. त्यामुळे साताऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा उभारी घेणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

कराडचे सुपुत्र असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी सातारचं नेतृत्त्व केलं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेच झाले. देशाच्या राजकारणात गेल्यानंतरही यशवंतराव चव्हाण यांचं साताऱ्याकडे विशेष लक्ष होतं. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर त्यांचे मानसपुत्र 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन केली. तेव्हा, झालेल्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्हा शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहिला. 9 राष्ट्रवादीचे तर काँग्रेसचा फक्त एकच आमदार 1999 साली निवडून आला होता.

- Advertisement -

हेही वाचा : नवा CM कोण होणार? शिंदे मुख्यमंत्रिपदावरून नाराज? केसरकरांनी सगळंच क्लिअर सांगून टाकलं…

1999 पासून अगदी 2024 पर्यंत साताऱ्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, सहकारी संस्था, आमदार, खासदार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे होते. मात्र, सत्तेत आल्यापासून भाजपनं राष्ट्रवादीचा हा बुरूज पोखरण्यास सुरूवात केली होती. याचा प्रत्यय पहिल्यांदा आला लोकसभा निवडणुकीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) शशिकांत शिंदे आणि भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या लढत झाली. या निवडणुकीत उदयनराजे यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर पहिल्यांदा भाजपचा झेंडा फकडवला.

- Advertisement -

त्यानंतर विधानसभा निवडणूक लागली. राष्ट्रवादी काँग्रेसनं कराड उत्तर, फलटण, कोरेगाव, वाई, माण या पाच ठिकाणी उमेदवार उभे केले होते. मात्र, कराड उत्तरमधून सातत्यानं निवडून येणाऱ्या बाळासाहेब पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. कोरेगावमधून शशिकांत शिंदे यांना सलग दुसऱ्यांदा महेश शिंदे यांनी पराभूत केलं. फलटणमध्ये राजे गटाची ताकद दीपक चव्हाण यांच्या पाठीशी होते. पण, तरीही चव्हाण यांचा पराभव झाला. माणमध्ये प्रभाकर घार्गे यांच्यासाठी बड्या नेत्यांनी ताकद लावली होती. मात्र, जयकुमार गोरे यांनी घार्गे यांना पराभूत केलं आहे. तर, वाईत अरूणादेवी पिसाळ यांच्यासाठी शरद पवार, जयंत पाटील यांनी सभा घेत मकरंद आबा पाटील यांच्याविरोधात रान उठवलं होतं. पण, पिसाळ यांचाही पराभव झाला आहे.

तिकडे दक्षिण कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अतुलबाबा भोसले यांच्यात लढत झाली होती. या लढतीत अतुलबाबा भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर पहिल्यांदा भाजपला झेंडा फडकविला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सातारा जिल्ह्यात आपले अस्तित्वही राखता आलं नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रणनीती आखून उतरावं लागणार आहे. त्यासह भाजपकडून शरद पवार यांच्या शिलेदारांना निशाणा बनवलं जाऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी शिलेदारांना कामे करताना अडचणी येऊ शकतात. हे चक्रव्यूह राष्ट्रवादी आणि काँग्रेस कसे भेदणार? उभारी कशी घेणार? हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा : शिंदे अन् ठाकरे 51, तर शरद पवार विरुद्ध अजितदादांचे उमेदवार 40 जागांवर भिडले; कोण ठरलं वरचढ?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -