घरमहाराष्ट्रमुंबईतून ७५ अर्ज बाद ३६७ उमेदवारी अर्ज वैध

मुंबईतून ७५ अर्ज बाद ३६७ उमेदवारी अर्ज वैध

Subscribe

मुंबई शहर जिल्ह्यातील ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी आलेल्या उमेदवारी अर्जांची निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी शनिवारी छाननी केली. यामध्ये मुंबई आणि उपनगरातून तब्बल ७५ अर्ज बाद झाले तर ३६७ उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत.

मुंबई आणि उपनगरात शुक्रवारी सायंकाळपर्यंत 442 उमेदवारांनी अर्ज भरले होते. यामध्ये मुंबई शहरातून 107 उमेदवारांनी तर उपनगरातून 335 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची शनिवारी छाननी करण्यात आली. त्यात मुंबई शहरातून 13 अर्ज बाद ठरल्याने 94 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत.

- Advertisement -

मतदारसंघ, मतदान केंद्र, मतदार संख्या आणि भौगोलिक क्षेत्र इत्यादी बाबींचा विचार करता महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदारसंघांतून 335 उमेदवारांनी अर्ज भरले होते. अर्ज भरलेल्यांपैकी ६३ जणांचे अर्ज बाद ठरले तर २७२ जणांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले. पात्र ठरलेल्या उमेदवारांना 7 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -