मुंबई : गेल्या काही महिन्यांत राज्यात साथींच्या आजारांत वाढ झालेली आहे. त्यात डेंग्यू सारख्या आजाराने डोके वर काढले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना डेंग्यू झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अजित पवारांनी घरीच विश्रांती घेतली. अजित पवारांचा डेंग्यू आता बरा झालेला असतानाच आता राष्ट्रवादीचे काँग्रेसच्याच परंतु, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतच पाटील यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत स्वतः जयंत पाटील यांनी ‘एक्स’(ट्वीटर) अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. त्यांनी त्यांचे रिपोर्ट्स देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (After Ajit Pawar, NCP State President Jayant Patil contracted dengue)
हेही वाचा – ‘या’ महिला आमदाराच्या मुलीला मिठाईच्या नावाने 80 हजारांचा ऑनलाइन गंडा
ब्रीच कँडी रूग्णालयात जयंत पाटील यांनी तपासणी केली होती. त्यानंतर त्यांनी याबाबतचा तपासणी अहवाल ‘एक्स’ अकाउंटवर शेअर केला आहे. हे शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, “कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरूवात करेन.” तर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन. pic.twitter.com/AkkQGS5zhM
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 14, 2023
सध्या राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. ज्यामुळे शरद पवार गटाची मोठी जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर आहे. त्याशिवाय ते शरद पवार गटाचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे त्यांनी लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जयंत पाटील देखील घरीच विश्रांती घेत आहेत.