अमूल आणि मदर डेअरीनंतर इतर दूध कंपन्यादेखील वाढवणार किंमत

अमूल आणि मदर डेअरी दूधाच्या कंपनीने दूधाची किंमत वाढवल्यानंतर आता इतर दूध कंपन्यांनी देखील आपल्या प्रति लिटर दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील सर्वात मोठी दूध डेअरी अमूलने दुधाच्या दरात मोठी वाढ केली आहे. 17 ऑगस्ट पासून अमूलचे दूध 2 रुपयांनी महागले आहे. तर मदर डेअरीनेही दुधाचे दर 2 रुपयांनी वाढवले आहे. यापूर्वी 6 मार्च रोजी मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ केली होती.

दरम्यान, आता अमूल आणि मदर डेअरी दूधाच्या कंपनीने दूधाची किंमत वाढवल्यानंतर आता इतर दूध कंपन्यांनी देखील आपल्या प्रति लिटर दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गायीचे दूध 59 रूपये प्रति लिटर असणार आहे तर, म्हशीचे दूध 61 लिटर असणार आहे.

दूधाची दरवाढ 17 ऑगस्टपासून लागू
गुजरातसह संपूर्ण भारतात 17 ऑगस्टपासून अमूलचे दूध महाग झाले आहे. गुजरात को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने दुधाच्या दरात वाढ केली आहे. आता 500 मिली अमूल गोल्डची किंमत 31 रुपयांपर्यंत वाढणार आहे. यामुळे ग्राहकांना आता अमुल ताजाच्या 500 मिली पॅकेजसाठी 25 रुपये आणि अमूल शक्तीच्या 500 मिली पॅकेजसाठी 28 रुपये मोजावे लागणार आहेत.

अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर, पश्चिम बंगालच्या बाजारपेठांमध्ये दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे GCMMF ने म्हटले होते. वाढलेली ही किंमत 17 ऑगस्ट 2022 पासून सर्वत्र लागू झाली. 2 रुपये प्रति लिटर वाढ एमआरपीमध्ये 4 टक्के अनुवादित करते. हे सरासरी महागाई दरापेक्षा कमी आहे. यात कंपनीने किंमत वाढविण्यामागे असे कारण सांगितले की, अमूलच्या दुधाच्या किंमती ऑपरेशन आणि उत्पादनातील वाढीव खर्चामुळे वाढविण्यात आल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत केवळ पशुखाद्याचा खर्च सुमारे 20 टक्के वाढला आहे. यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिश्यावर भार येणार आहे.


हेही वाचा :उद्यापासून दूध 2 रुपयांनी महागणार; अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही केली दरवाढ