Aryan च्या अटकेनंतर शाहरुखवर लिहिलेली व्हायरल कविता वाचलीत का?

शाहरुखच्या सपोर्टसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी पुढे आले

after Aryan khan's arrest writer akhil katyal written Poem for Shah Rukh
Aryan च्या अटकेनंतर शाहरुखवर लिहिलेली व्हायरल कविता वाचलीत का?

शाहरुखचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड शाहरुखच्या पाठिंब्यासाठी पुढे आले. आर्यनच्या अटकेनंतर सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त प्रतिक्रिया समोर आल्या. शाहरुखच्या फॅन्सने त्याच्या बंगल्याबाहेर पोस्टर लावून टेक केअर किंग असे म्हटले होते. पुन्हा एकदा सोशल मीडियावर शाहरुखसाठी एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यात शाहरुखसाठी एक सुंदर कविता लिहिली आहे. लेखक अखिल कात्यालची ही कविता सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या कवितेत त्याने शाहरुख खानविषयी त्याचे विचार मांडले आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी देखील कवितेच्या ओळी ट्विट करत शाहरुख विषयी प्रेम व्यक्त केले आहेत.

वाचा अखिल कात्यालने लिहिलेली कविता 

अभिनेता नीरज घेवाणने हि कविता रिट्विट करत शाहरुखला टॅग केले आहे आणि त्याखाली शानदार कॅप्शन देखील दिले आहे.

 

तसेच अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील अखिल कात्यालची कविता शेअर केली आहे.

याआधी देखील शाहरुखच्या सपोर्टसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी पुढे आले होते. लेखक अखिल कात्यालने शाहरुखसाठी लिहिलेल्या या ओळी सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत. शाहरुखच्या शुभचिंतकांनी ही कविता मोठ्या प्रमाणात शेअर केली आहे. आपण पाहिले तर, सुनिल शेट्टी, हंसल मेहता,सुजैन खान,ह्रतिक रोशन, रवीना टंडण,सोनू सूद, आलिया भट्ट यासारख्या अनेक कलाकांनी शाहरुखला सपोर्ट केला आहे.

आर्यन खानला सध्या १४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालायीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्याने आता १३ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीत तरी आर्यन सुटणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.


हेही वाचा – Cruise Drugs Case: मुलाच्या काळजीने शाहरुख अस्वस्थ; अन्नही गोड लागेना