घरताज्या घडामोडीअंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन कोरोनामुक्त, AIIMS मधून डिस्चार्ज

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन कोरोनामुक्त, AIIMS मधून डिस्चार्ज

Subscribe

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळेच छोटा राजनला उपचारासाठी दिल्लीतल्या AIIMS रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. छोटा राजनने या उपचारांना चांगला प्रतिसाद देत अखेर कोरोनावर मात केली आहे. छोटा राजन या कोरोनातून सावरत असून आज मंगळवारी छोटा राजनला AIIMS मधून डिस्चार्ज देण्यात आला. ANI या वृत्तसंस्थेने याबाबतची बातमी दिली आहे. काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या निधनाच्या बातम्यांची एकच अफवा आली होती. पण या अफवेनंतर एम्स प्रशासन आणि दिल्ली पोलिसांनी या बातमीत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे छोटा राजनच्या मृत्यूबाबतच्या सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. आज एम्समधून डिस्चार्ज दिल्यानंतर छोटा राजनची पुन्हा एकदा तिहार जेलमध्ये रवाना करण्यात आली.

भारताला अनेक गुन्ह्यांमध्ये हवा असलेला ६१ वर्षीय छोटा राजनला २०१५ मध्ये इंडोनेशियातील बाली येथून अटक करून भारतात आणण्यात आले होते. तेव्हापासूनच छोटा राजन हा उच्च दर्जाची सुरक्षा असणाऱ्या तिहार जेलमध्ये आहे. तिहार जेलमध्ये छोटा राजनला २ नंबर जेलमध्ये सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. कोरोनामुळे छोटा राजनला २२ एप्रिलला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. जेल प्रशासनातील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर चाचणीमध्ये छोटा राजनही कोरोना पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले होते. टाईम्स ऑफ इंडियाचे पत्रकार ज्योतिर्मय डे हत्या प्रकरणात छोटा राजनने कट रचल्याचे उघडकीस आल्यानेच छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. छोटा राजनविरोधात देशभरात ७० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच ही सगळी प्रकरणे सीबीआयकडे देण्यात आली आहेत. त्यानंतर एका विशेष कोर्टाचीही नियुक्ती करण्यात आली.

- Advertisement -

 


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -