घरताज्या घडामोडीकरोनानंतर राज्यावर आणखी एक मोठं संकट

करोनानंतर राज्यावर आणखी एक मोठं संकट

Subscribe

करोनानंतर महाराष्ट्रात अजून एक संकट येणार आहे.

वुहान येथून येणाऱ्या करोना व्हायरसने जगभरात हाहाकार केला आहे. त्यानंतर हा व्हायरस राज्यात येऊन देखील हातपाय पसरु लागला. सध्या या विषाणूमुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली असून हा आकडा ८९ वर गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे करोनाशी सामना करावा लागत असताना आता राज्यावर अजून एक मोठ सकंट येणार आहे.

वादळी वाऱ्यासह पडणार पाऊस

महाराष्ट्रात आता करोनानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या २४ आणि २५ मार्चला अवकाळी पाऊस हजेरी लावणार असून विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या काही भागात हा पाऊस पडणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे. तसेच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतीचे पुन्हा एकदा नुकसान होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

राज्याच्या काही भागांवर पुढील ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, महाबळेश्वर, खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

- Advertisement -

राजस्थानमध्ये येत्या २५ आणि २६ मार्च रोजी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे २६ मार्च रोजी इंदूर, उज्जैन, रतलाम, देवास, कोटा, सवाई माधोपूर, जोधपूर, उदयपूर, अहमदाबाद, बडोदा, गांधीनगर आणि नाशिक अशा अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २७ मार्चपासून दक्षिण राजस्थान आणि गुजरातमध्ये पाऊस कमी होणार आहे. परंतु, मध्य प्रदेशात भोपाळसह अनेक शहरांमध्ये पाऊस सुरूच राहील, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.


हेही वाचा – मोठी बातमी: सर्व EMI, इन्स्टॉलमेंट्सची वसुली तात्पुरती थांबवा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -