घर thane शरद पवारांवरील टीकेनंतर छगन भुजबळांविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

शरद पवारांवरील टीकेनंतर छगन भुजबळांविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

Subscribe

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद आज ठाण्यात उमटले. अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या सभेतून शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे ठाण्यात त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांचा पुतळा जाळून त्यांच्याविरोधात निषेध करत घोषणाबाजी केली आहे.

छगन भुजबळ यांच्याविरोधातील आंदोलन हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महिलाध्यक्षा सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. बीड येथे झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. बीडच्या सभेत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यानंतर आज ठाण्यात याचे पडसाद पडले.

- Advertisement -

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील , युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे, असंघटीत कामगार सेलचे राजू चापले, व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय , सामाजिक न्याय विभाग सेलचे अध्यक्ष कैलास हावळे, अर्बन सेलच्या अध्यक्षा रचना वैद्य, समीर नेटके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा – Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदासाठी नाही तर, अजित पवार ‘या’ कारणाने सरकारमध्ये; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा

भुजबळ तुरुंगातून सुटल्यानंतर मंत्रीपद मिळाले – सुहास देसाई

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्याकडून भुजबळ यांची गद्दार अशी संभावना करीत त्यांच्या पुतळ्यास जोडे मारून पुतळा जाळण्यात आला. या प्रसंगी सुहास देसाई म्हणाले की, भुजबळ यांच्यावर शरद पवार यांनी प्रचंड प्रेम केले होते. तुरुंगातून सुटल्यानंतरही भुजबळ यांना शरद पवार यांनी मंत्रीपद दिले. शरद पवार यांच्याकडून सर्व मिळवून मोठे झाल्यानंतर भुजबळ हे गद्दारी करीत असतील. तर आम्ही ते सहन करणार नाही. आमच्या दैवताचे फोटो वापरतात आणि आमच्याच दैवताचा असा अपमान करणार असाल तर ते आम्ही सहन करणार नाही. त्यांच्या या कृतीला आम्ही उत्तर देऊच, असा इशाराही देसाई यांनीही दिला.

भुजबळ नेमके काय म्हणाले

छगन भुजबळ म्हणाले, “मी 23 डिसेंबर 2003 मध्ये उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तेव्हा मी गृहमंत्री देखील होतो त्या काळात मी तेलगीला अटक करताना मकोका लावण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी तुम्ही मला राजीनामा देण्यास सांगितले. झी चॅनवर दगडफेक झाली आहे. यानंतर गोयल यांचा फोन आला. तुम्ही राजीनामा द्या. पण गोयल हे म्हणाले की, भुजबळांचा दोष नाही, मग असे असतानाही तुम्ही माझा राजीनामा का घेतला”, असा सवाल भुजबळांनी पवारांना केला आहे.

 

- Advertisment -