Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र संजय राऊतांना नाना पटोले आणि अब्दुल सत्तारांनी सुनावले खडेबोल; काय आहे कारण?

संजय राऊतांना नाना पटोले आणि अब्दुल सत्तारांनी सुनावले खडेबोल; काय आहे कारण?

Subscribe

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना उद्धव ठाकरेंवर संपाप व्यक्त केला आहे. यावेळी शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील उडी घेतल संजय राऊतांची तुलना थेट कुत्र्यांशी केली. 

मुंबई | सामनाच्या (Saamana) आजच्या अग्रलेखात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर आक्रमक पवित्रा घेत टीका केली आहे. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील संजय राऊतांवर संपाप व्यक्त टीका आहे. यात शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी देखील उडी घेतल संजय राऊतांची तुलना थेट कुत्र्यांशी केली.

नाना पटोले म्हणाले, “संजय राऊत गौण विषय आहे. आमची बोलणी ही थेट उद्धव ठाकरेंशी असते. यामुळे संजय राऊतांना आम्ही फार गांभीऱ्याने घेण्याची गरज नाही, असे ते म्हणाल. तसेच राज्यातील सत्तासंघर्षावर नाना पटोले म्हणाले, “राज्याच्या सत्तासंघर्षावर १२ तारखेला निकाल येणार आहे. यानंतर राज्यातील शिंदे सरकार पडले, असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही, जगताप यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर नाना पटोलेंचा संताप

राऊतांची अवस्था ही कुत्र्यासारखी – अब्दुल सत्तार

- Advertisement -

शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राऊतांवर बोलताना जीम घसरली, अब्दुल सत्तारांनी राऊतांची तुलना ही कुत्र्यांशी केली आहे. अब्दुल सत्तार म्हणाले, “आम्हीच राऊतांना राज्यसभेवर पाठविले असून कुत्र्यासारखी त्यांची अवस्था झाली आहे. ते रोज सकाळी उठतात आणि भुंकतात. यापेक्षा राऊतांची वाईट आम्हाला बोलता येत नाही. आमच्याच मतावर राऊत राज्यसभेवर गेले आहेत. राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा. जर राऊतांनी राजीनामा दिला तर मी पण राजीनामा देईन, असे चॅलेंज सत्तारांनी दिली आहे.

- Advertisment -