घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाट्यमय घडामोडींनंतर नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक बिनविरोध

नाट्यमय घडामोडींनंतर नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक बिनविरोध

Subscribe

नाशिक : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या २०२३-२८ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नाशिक शाखेतून तीन प्रतिनिधी बिनविरोध निवडण्याचा ठराव करण्यात आला. ऐनवेळी चौघांनी नाशिक शाखेच्या पदाधिकार्‍यांना विचारात न घेता परस्पर मध्यवर्ती शाखेकडे नाशिकचे प्रतिनिधी म्हणून अर्ज भरला. मात्र, अर्ज छाननीत तेच चौघे अपात्र ठरले. त्यामुळे नाशिक शाखेचे एकमताने निश्चित केलेले सुनील ढगे, प्रा. रवींद्र कदम, राजेंद्र जाधव यांचे अर्ज पात्र ठरले, अशी माहिती प्रा. रवींद्र कदम यांनी दिली.

नाट्य परिषदेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत प्रा. कदम पुढे म्हणाले की, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेतून तीन प्रतिनिधी निवडीसाठी प्राजक्त देशमुख, जयेश आपटे, सुरेश गायधनी, राजेश जाधव, प्रा. रवींद्र कदम, सुनील ढगे, राजेंद्र जाधव, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी अर्ज भरले होते. प्राजक्त देशमुख, जयेश आपटे, सुरेश गायधनी, राजेश जाधव यांचे अर्ज अपूर्णतेच्या कारणांमुळे अपात्र ठरले. देशमुख यांनी अर्जासोबत फोटो दिला नव्हता तर, उर्वरित तिघांनी अर्जासोबत पॅनकार्ड व आधारकार्डची झेरॉक्स सादर केली नव्हती. त्यामुळे सुनील ढगे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, राजेंद्र जाधव, रवींद्र कदम यांचे अर्ज पात्र ठरविण्यात आले. मात्र, डॉ. धर्माधिकारी यांनी माघार घेतली. त्यामुळे सुनील ढगे, राजेंद्र जाधव व रवींद्र कदम यांची बिनविरोध निवड झाली.

- Advertisement -
..तर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाद मागितली असती

अखिल भारतीय नाट्य परिषद, अखिल भारतीय नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेच्या २०२३-२८ पंचवार्षिक निवडणूक होत आहे. नाशिक शाखेतून तीन प्रतिनिधी मध्यवर्ती शाखेला नियामक मंडळासाठी पाठवायचे आहेत. या निवडीसाठी अध्यक्ष व प्रमुख कार्यवाह जो निर्णय घेतील, तो निर्णय मान्य असेल, असे एकमताने नाशिक शाखेच्या बैठकीत निश्चित झाले होते. तरीही चौघांनी परस्पर मध्यवर्ती शाखेत अर्ज दाखल केले. त्यांचे अर्ज पात्र झाले असते तर ठराव देत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाद मागितली असती.

बिनविरोध निवडीचा ठराव असताना चौघांनी भरले अर्ज

नाट्य परिषद नाशिक शाखेची ३० डिसेंबर २०२२ रोजी सर्वसाधारण सभा झाली होती. त्यावेळी नाशिकचे तीन प्रतिनिधी बिनविरोध निवडीचा ठराव करण्यात आला. तरीही चौघांनी परस्पर अर्ज भरले. त्यांनी घटनेची पायमल्ली केली आहे. विशेष म्हणजे, अपात्र ठरलेले राजेश जाधव हे सर्वसाधारण बैठकीस उपस्थित होते. सुरेश गायधनी यांनी सुसंवाद ठेवला नाही. कोरोनाकाळात नाट्य परिषद शाखेने १० लाख रुपये देणगी स्वरुपात मिळवत नाशिकमधील कलावंतारांना किराणासह सर्वतोपरी मदत केली.

निवडणूक रणधुमाळीशी फारशी ओळख नाही. मी स्क्रिप्टप्रमाणे चालणारा माणूस आहे. पॅनलची स्क्रिप्ट तयार झाली असून, त्याप्रमाणे काम सुरू आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढे काय होईल, कसे होईल माहिती नाही. आधी काय झाले यापेक्षा पुढे काय करायचे, याचे स्क्रिप्ट तयार केले जात आहे. निवडणुकीसाठी मतदान कसे वाढेल, यावर लक्ष दिले आहे. काय करायचे नाही, हे आधी ठरविले आहे. मागील पंचवार्षिकमध्ये काय झाले ते उकरून काढले जाणार नाही. त्यातून काही निष्पन्न होत नाही. महाराष्ट्रातून निवडून येणारे ६० जण अध्यक्ष निवडणार आहेत. गेल्या ४० वर्षांपासून रंगमंचावर काम करत आहे. जमेल तसे नाट्य व्यवसायाला उभारी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. पद नसतानाही भरपूर काम केले आहे. नाट्य परिषद शाखा आणि मध्यवर्ती शाखेमध्ये समन्वय असला पाहिजे. मुंबईत येणार्‍या नवोदित कलावंतांसाठी निवासाची व्यवस्था असली पाहिजे. या कलावंतांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात सर्व कलावंतांसह रसिकांनाही सहभागी केले जाईल. : प्रशांत दामले, अध्यक्ष पदाचे उमेदवार तथा ज्येष्ठ अभिनेते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -