घरताज्या घडामोडीविधीमंडळाच्या गटनेते पदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी; अजय चौधरी नवे शिवसेनेचे गटनेते

विधीमंडळाच्या गटनेते पदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी; अजय चौधरी नवे शिवसेनेचे गटनेते

Subscribe

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेकडून पहिली कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची विधान भवनाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेकडून पहिली कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची विधान भवनाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंच्याऐवजी आमदार अजय चौधरी यांची शिवसेनेच्या विधान भवनातील गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (After Eknath Shinde Ajay Chaudhary is the new Shiv Sena group leader)

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्षांसह ३५ आमदार असल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणावर बंडाळी केल्याने उद्धव ठाकरे यांनी दुपारी वर्षा बंगल्यावर तातडीने बैठक बोलवली होती.

- Advertisement -

या बैठकीला शिवसेना आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. या बैठकीत शिवसेनेचे विधानसभेतील १४ आमदार दाखल झाले आहेत.


हेही वाचा – एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप; शरद पवार, देवेंद्र फडणवीस आहेत कुठे?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -