घरताज्या घडामोडीजिंकून दाखवणारच! चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

जिंकून दाखवणारच! चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Subscribe

शिवसेनेचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवलं. त्यामुळे आता शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेंकांवर टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला.

शिवसेनेचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवलं. त्यामुळे आता शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेंकांवर टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला. मात्र, निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “जिंकून दाखवणारच” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. (after election commission froze shiv senas symbol uddhav thackeray first reaction)

उद्धव ठाकरे यांनी इंस्टाग्रामवर चिन्ह गोठवल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काढलेला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत उद्धव ठाकरे यांनी “जिंकून दाखवणारच” असे म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uddhav Thackeray (@uddhavthackeray)

- Advertisement -

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात शनिवारी चार तास झालेल्या बैठकीनंतर, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. आता दोन्ही गटांना स्वत:च्या पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. सोमवारी, 10 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याच्या आड लबाडी लपवण्याचं सामर्थ्य; मनसेचा हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -