घर महाराष्ट्र पुणे मुंबईतील जीटीपाठोपाठ आता पुण्याच्या ससून रुग्णालयातही 'ट्रांसजेंडर स्पेशल वॉर्ड'

मुंबईतील जीटीपाठोपाठ आता पुण्याच्या ससून रुग्णालयातही ‘ट्रांसजेंडर स्पेशल वॉर्ड’

Subscribe

मुंबईच्या जीटी हॉस्पिटलनंतर आता पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये तृतीयपंथीयांसाठी एक स्पेशल वॉर्ड सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता ट्रांसजेंडर लोकांना ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेणं सुकर होणार आहे.

मुंबईच्या जीटी हॉस्पिटलनंतर आता पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये तृतीयपंथीयांसाठी एक स्पेशल वॉर्ड सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता ट्रांसजेंडर लोकांना ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेणं सुकर होणार आहे. 24 बेड आणि 2 आयसीयू बेडसह हा वॉर्ड असणार आहे. (After GT in Mumbai now Transgender Special Ward in Pune s Sassoon Hospital)

मागच्या काही दिवसांपासून तृतीयपंथीयांना अनेक आरोग्याच्या समस्या जाणवत असल्याचं समोर आलं होतं. त्यात अनेकदा रुग्णालयात असा स्पेशल वॉर्ड नसल्यामुळे उपचार करण्यासाठी आणि तृतीयपंथीयांना उपचार घेण्यासाठी मोठ्या समस्यांना समोरं जावं लागत होतं. त्यामुळे तृतीयपंथीयांसाठी वेगळा वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या स्पेशल वॉर्डचं अनावरण करण्यात आलं.

- Advertisement -

देशातला पहिला 30 खाटांचा विशेष कक्ष मुंबईतील जीटी रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आला होता. महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते या विशेष कक्षाचं ई- उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यानंतर राज्यभर सुविधेचा विस्तार करण्यासाठी सरकारने समुदायातील सदस्यांना त्यांच्या सूचना आणि अभिप्राय शेअर करण्यास सांगितले होते. त्यानुसार आता पुण्यातील ससून रुग्णालयात स्पेशल वॉर्ड सुरू करण्यात आला आहे.

( हेही वाचा: मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने रोहित पवारांनी साधला शिंदे गटातील आमदारांवर निशाणा )

तृतीयपंथीयांना एमएमआरमध्ये देणार २५२ घरं

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वीच शिंदे सरकारने तृतीयपंथीयांना घरं देण्याचा निर्णय घेतला होता. नागपूरमध्ये एनआयटीने २५२ घरे बांधली असून या घरांची किंमत ९ लाख रुपये निश्चित केली आहे. या घरांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या अंदाजपत्रकातून प्रधानमंत्री आवास योजनेच्या धोरणाप्रमाणे अडीच लाखांची सबसिडी प्रस्तावित करण्यात आली आहे. या घरांसाठी वित्त विभागाने तातडीने ६ कोटी ३० लाख रुपये सामाजिक न्याय विभागाला द्याव्यात अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांना दूरध्वनीवरून दिल्या होत्या. त्यानंतर ही २५२ घरे तृतीयपंथीयांना देण्याचेही निर्देश त्यांनी दिले. देशात प्रथमच तृतीयपंथीयांसाठी घरांचा प्रयोग नागपुरात राबविण्यात येणार असून त्याधर्तीवर मुंबई महानगर क्षेत्रातदेखील सिडको, म्हाडाच्या सहकार्याने तृतीयपंथीयांसाठी ५०० घरे बांधण्यासाठी विशेष योजना तयार करणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंकडून सांगण्यात आले.

- Advertisment -