करुणा शर्मांच्या अटकेनंतर त्यांची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

After Karuna Sharma's arrest, he was remanded in judicial custody for 14 days

पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयाने करुणा शर्माला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. करुणा शर्मा यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यांना अटकही करण्यात आली होती. आता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर करुणा शर्मा यांना प्रसिद्धी मिळाली होती.

जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार –

पती अजय देढे आणि करुणा शर्मा यांनी पुणे येथील भोसरी परिसरात देढे याच्या पत्नीला बोलावले. त्यानंतर हॉकी स्टीकच्या सहाय्याने धमकावले, यावेळी करुणा शर्मा यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली त्याचबरोबर पती अजय कुमार देढेने आपल्यावर अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले आणि मानसिक, शारीरिक त्रास दिला, असे 32 वर्षीय पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. येरवडा पोलिसांत पीडितेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी पीडितेचा पती आणि करुणा शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.

सप्टेंबर 2011 साली बीडमध्ये गुन्हा –

या आधी जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मांवर सप्टेंबर 2011 साली बीडमध्ये गुन्हा दाखल झाला होता. करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. या व्हिडिओत शर्मा यांची गाडी बाजारात आली असल्याचे दिसते. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही वेळ बाजारात थांबली. त्याचाच फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचे व्हिडिओत दिसत आले होते.