घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रातील वाहनांच्या तोडफोडीनंतर फडणवीसांचा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंना फोन

महाराष्ट्रातील वाहनांच्या तोडफोडीनंतर फडणवीसांचा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंना फोन

Subscribe

कन्नड वेदिका रक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव-हिरेबागवाडी टोलनाक्याजवळ महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष्य केले. बेळगावमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला झाल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. या हल्ल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी फोन केल्याचे समजते.

कन्नड वेदिका रक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव-हिरेबागवाडी टोलनाक्याजवळ महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष्य केले. बेळगावमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला झाल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. या हल्ल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी फोन केल्याचे समजते. देवेंद्र फडणवीसांनी बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदविली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात फोनवर चर्चा झाली. या चर्चेमध्ये या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच, महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांना संरक्षण दिले जाणार असल्याचे बसवराज बोम्मई यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितल्याचे समजते.

- Advertisement -

दरम्यान, या हल्ल्यानंतर कर्नाटक सरकारकडून सीमारेषेवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा एकही नेता बेळगावमध्ये जाऊ नये म्हणून कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीमाभागातील २१ नाक्यांवर दोन हजार पोलीस तळ ठोकून आहेत. ६ डिसेंबरपर्यंत हा बंदोबस्त कायम राहणार आहे.

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

पुण्याहून बंगळुरुकडे जाणाऱ्या या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाड्यावर चढून घोषणाबाजी केली. तसंच हे गाड्यांसमोर आणि गाडीखाली झोपले महाराष्ट्रातील गाड्या पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर कन्नड रक्षण वेदिका संघटनेत्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येण्याची शक्यता पाहून कन्नड रक्षण वेदिका संघटना आक्रमक झाली आहे. या संघनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या चौकात रास्तारोको केला. तसंच रस्त्यावर लोळण घेत वाहने अडवली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ देऊ नका, अशी मागणी कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीय. तर महाराष्ट्राच्या मंत्र्यांना आणि खासदारांना बेळगावात प्रवेश दिला जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद हा न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले होते. मात्र आज (मंगळवारी) कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. मंगळवारी दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला.

 


हेही वाचा – सीमावाद पेटला : कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा महाराष्ट्राच्या ६ वाहनांवर हल्ला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -