घरमहाराष्ट्रFadnavis VS Jarange : जरांगेंच्या आरोपानंतर भाजपाचा पवारांवर हल्लाबोल; ज्यांनी आपल्या हयातीत...

Fadnavis VS Jarange : जरांगेंच्या आरोपानंतर भाजपाचा पवारांवर हल्लाबोल; ज्यांनी आपल्या हयातीत…

Subscribe

मुंबई : देवेंद्र फडणवीस हे माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप मराठ आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. या आरोपानंतर विरोधकांनी फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, पण भाजपासुद्धा महाविकास आघाडीवर आरोप करताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे, हे सरकारने शोधण्याची आवश्यकता असल्याचे भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. तर मराठा आरक्षण मिळावं या भूमिकेचे भाजपा समर्थक आहे, असे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे. (After Manoj Jaranges allegations BJP attacks Sharad Pawar Those who did not give reservation in their lifetime are now criticizing Devendra Fadnavis)

हेही वाचा – Eknath Shinde : मनोज जरांगेंना अटक करण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, “संयमाचा अंत पाहू नका”

- Advertisement -

माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता म्हटले की, ज्यांनी आपल्या हयातीत आरक्षण दिले नाही, ते आता जरांगेंच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत आहेत. याचवेळी मनोज जरांगे यांना इशारा देताना म्हटले की, त्यांनी आता तोंड सांभाळून बोलण्याची आवश्यकता आहे. मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे होते ते सरकारने दिले आहे. आता नेमकं जरांगेंना काय हवे आहे? असा सवाल करत जरांगेंना देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून राजकारण करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. यामागचा बोलविता धनी कोण आहे, हे सरकारने शोधण्याची आवश्यकता आहे.

मराठा समाजाने 7/12 जरांगेंच्या नावावर केलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून सागर बंगल्यावर चाल करून जरांगे जाणार असतील तर आम्हालाही ऍक्शनला रीऍक्शन द्यावी लागेल. आतापर्यंत मराठा समाजाने आपल्याला एका प्रामाणिक भूमिकेतून समर्थन दिले. पण मनोज जरांगे आता पूर्ण राजकारणी झाले आहेत. त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे महाराष्ट्राला नीट माहित आहे. ज्यांनी आपल्या हयातीत मराठा आरक्षण दिले नाही ते आता मनोज जरांगे यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. जरांगे यांना नैराश्य आले आहे. नैराश्यापोटी जरांगे आता टोकाची भाषा करायला लागले आहेत. सरकारने, गृहखात्याने याची दखल घ्यावी. नाहीतर आम्हालाही सागर बंगल्यावर जशास तसे उत्तर द्यायला थांबावे लागेल, असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी दिला.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : मनोज जरांगेचे आरोप बिनबुडाचे, पण सागर बंगल्यावर…; फडणवीसांची प्रतिक्रिया

फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना टिकणारं आरक्षण दिले

मनोज जरांगे यांच्या आरोपानंतर आमदार आशिष शेलार म्हणाले की, मराठा समाजाला न्याय मिळावा, आरक्षण मिळावं या भूमिकेचं भारतीय जनता पार्टी समर्थक आहे. समाज जी मागणी मागतोय त्याला पूर्ण करण्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया होणे आवश्यक आहे. या कायदेशीर प्रक्रियेला पूर्ण करण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा मान्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना न्यायिक टिकणारं आरक्षण दिले होते. न्यायिक, टिकणारं आरक्षण देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणं हे असमर्थनीय आहे. समाजाला न्याय आपण मिळवून देऊ हीच भूमिका या सरकारची आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन अताच 10 टक्के टिकणारं आरक्षण दिले आहे. आणखी जे विषय प्रलंबित आहेत ते प्रलंबित विषय सुद्धा चर्चेत सुटून जाऊ शकतात. या सगळ्यांमध्ये कुठलातरी राजकीय रंग आणणं हे मराठा समाजाला मान्य नाही. याबाबतीत राजकारण करता कामा नये हीच समाजाची भूमिका आहे, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -