घरमहाराष्ट्रराऊतांनी मविआला मत देऊ नका सांगितले तरी आम्ही करणार -...

राऊतांनी मविआला मत देऊ नका सांगितले तरी आम्ही करणार – देवेंद्र भुयार

Subscribe

संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणूकीतील पराभवानंतर अपक्ष आमदारांची नावे घेत त्यांनी मतदान न केल्याचा आरोप केला होता. यानंतर देवेंद्र भुयारांनी नाराजी व्यक्त करत विचार करावा लागेल अशी प्रतिक्रीया दिली होती. यानंतर आमदार भुयार यांनी संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजीत पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर संजय राऊन साहेबांनी समोर येऊन सांगीतले की महाविकास आघाडीला मतदान देऊ नका तरी आम्ही मतदान महाविकास आघाडीलाच करणार असल्याचे  आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगीतले.

गौरसमज हे संजय राऊत साहेबांचे होते –

- Advertisement -

गौरसमज हे संजय राऊत साहेबांचे होते आणि नाराजी मग आमची झाली. कारण त्यांनी जाहीर पणाने असे वक्तव्य करणे चूकीचे आहे. शंभर टक्के चूकीचे आहे. शरद पवार साहेब आणि अजित दादांनी मान्य केले की हे चूकीचे आहे. राजकीय दृष्या सामान्य दृष्या याचे परिणाम आमच्यावर होतो. कारण आम्ही बलांढ्य शक्तींच्या विरोधा लढायला लागलो आणि आमच्यावर असा अविश्वास दाखवणे फार चूकीचे आहे. म्हणून मी त्यांची भेट घेतली आणि बऱ्यापैकी हे प्रकरण थांबले आहे, असे देवेंद्र भुयार म्हणाले.

मतदान महविकास आघाडीला करणार –

- Advertisement -

संजय राऊन साहेबांनी समोर येऊन सांगीतले की महाविकास आघाडीला मतदान देऊ नका तरी आम्ही मतदान महाविकास आघाडीलाच करणार मी व्यक्तीशा करणार . भाजपची निती मला व्यक्तीशा पटत नाही. त्यामुळे भाजपला दुसरा पर्याय म्हणून महाविकास आघाडी पर्यायाने देशाचे नेते शरद पवार साहेब आणि अजित दादान यांच्या मार्गदर्शनाखाली मी महाविकास आघाडीला मतदान करणार, असेही देवेंद्र भुयार म्हणाले.

विचार करावा लागणार म्हणजे – 

विचार कारावा लागणार म्हणजे पवार साहेबांनी सुद्धा सांगीतले की सगळ्या आमदारांनी एकत्रीत बसून आपण विचार करावा. त्यांनी अशी मुख्यमंत्र्यांना सुद्धा सूचना दिली आहे. उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा सूचना दिली आहे. बाळासाहेब थोरातांना सुद्धा त्यांनी सूचना केली आहे. निवडणूका आल्यावर ग्रर्ड हायत, ट्रायडंट म्हणजे तीथे 5 स्टार हॉटेल आहे तेथे बोलवतात पण निवडणूक संपली की तोंडाकडे पाहात नाहीत. हे दुर्दैवच आहे. विशेषता अपक्ष आमदारांचे दुर्दैव आहे. असे होऊनये म्हणून आम्ही बऱ्याच गोष्टींची कमीटमेंट करून घेणार आहोत. आम्हाल नुसते निवडणूकी पुरते स्था राहते बाकी काही आमच्या निधी बंद्दल त्यांच्या प्रश्ना सदर्भात त्यांच्या अडअडचनी सदर्भात स्थान मीळत नाही. फक्त सहाव्या मजल्यावर अजित पवारांकडे स्थान मिळते, असे देवेंद्र भूयार म्हणाले.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -