Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नालासोपाऱ्यानंतर नागपूरातही तोच प्रकार,ऑक्सिजन अभावी गमावला ४ जणांनी जीव

नालासोपाऱ्यानंतर नागपूरातही तोच प्रकार,ऑक्सिजन अभावी गमावला ४ जणांनी जीव

पहाटे ३ वाजता रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली. मात्र ऑक्सिजन न मिळाल्याने ४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.

Related Story

- Advertisement -

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती आणखीनच भयानक होत चालली आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे रेमडिवीर इंजेक्शन त्याचबरोबर आता ऑक्सिजनचाही पुरवठा अपुरा पडत आहे. नालासोपऱ्यात ऑक्सिजन अभावी ७ जणांनी जीव गमावल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे नागपूरतही ऑक्सिजन अभावी ४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागपूरच्या कन्हान कांदरी येथील जवाहरलाल नेहरु रुग्णालयातील ही धक्कादायक घटना आहे. पहाटे ३ वाजता रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली. मात्र ऑक्सिजन न मिळाल्याने ४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेवर तीव्र संपात व्यक्त केला जात आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत जवाहरलाल नेहरु रुग्णालयाची तोडफोडही केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ कोरोनाग्रस्तांवर या रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. त्यामुळे नागपूरच्या जिल्हा परिषदने नागपूर वेस्टर्न कोल्ड फील्डचे जवाहरलाल नेहरु हे रुग्णालय कोविड सेंटर म्हणून सुरु करण्यात आले होते.

- Advertisement -

नालासोपाऱ्यातील रुग्णालयातही सोमवारी ऑक्सिजनचा पुरवठा न मिळाल्याने ७ जणांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत रुग्णालयाच्या बाहेर गोंधळ घातला होता. नालासोपाऱ्याच्या विनायका रुग्णालयात हा धक्कादाक प्रकार घडला. राज्यात सध्या कोरोनावर प्रभावी ठरलेले रेमडिसीवीस इंजेक्शनचा अभाव जाणवत असतानाच रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठाही अपुरा पडत आहे.


हेही वाचा – ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – एकनाथ शिंदे

- Advertisement -

 

 

 

- Advertisement -