घरताज्या घडामोडीपूनम महाजनांच्या संतापानंतर राऊतांनी ते ट्विट केलं डिलीट, काय होतं ट्विट? जाणून...

पूनम महाजनांच्या संतापानंतर राऊतांनी ते ट्विट केलं डिलीट, काय होतं ट्विट? जाणून घ्या

Subscribe

स्वर्गीय बाळासाहेब आणि स्वर्गीय प्रमोदजी या दोन व्यक्तींनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्द सारखी व्यंगचित्रे दाखवू नका." पूनम महाजन यांच्या या ट्विटनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपले व्यंगचित्राचे ट्विट डिलीट केलं आहे.

भाजप खासदार पूनम महाजन यांनी संताप व्यक्त केल्यानंतर शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी कार्टूनचे ट्विट डिलीट केले आहे. संजय राऊत यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रमोद महाजन आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संबंधित एक कार्टून पोस्ट केले होते. या कार्टूनच्या पोस्टवर पूनम महाजन यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ वर्षाच्या युतीवरुन भाजपवर घणाघात केला होता. यानंतर आता संजय राऊतांनी ट्विट केल्यामुळे आणखी वाद निर्माण झाला आहे. दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दासारखी व्यंगचित्रे दाखवू नका असे वक्तव्य खासदार पूनम महाजन यांनी केलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी आरके लक्ष्मण यांचे जुने व्यंगचित्र ‘हिंदुत्व’ राजकारणावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या युतीवरुन ट्विट केले. या व्यंगचित्रात प्रमोद महाजन हे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सूचना घेताना दाखवले आहेत. कोण कोणामुळे वाढले उघडा डोळे बघा नीट असे संजय राऊत यांनी म्हटलं होते. तसेच व्यंगचित्रात बाळासाहेब ठाकरे खुर्चीवर बसले आहेत. त्यांच्यासमोर एक व्यक्ती उभा असून हॅव अ सीट असं विचारताना दाखवले आहे. या ट्विटमध्ये भाजप खासदार पूनम महाजन यांनी ट्विट केलं आहे.

या व्यंगचित्रामुळे संतप्त झालेल्या माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांची मुलगी आणि सध्या भाजप खासदार पूनम महाजन यांनीही एक ट्विट केले आहे. पूनम महाजन यांनी म्हटलं आहे की, स्वर्गीय बाळासाहेब आणि स्वर्गीय प्रमोदजी या दोन व्यक्तींनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्द सारखी व्यंगचित्रे दाखवू नका.” पूनम महाजन यांच्या या ट्विटनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपले व्यंगचित्राचे ट्विट डिलीट केलं आहे.

- Advertisement -

राऊतांचे स्पष्टीकरण

संजय राऊत यांनी आपेल ट्विट डिलीट केल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्या कुटुंबाचे नाते खूप जुने असल्यामुळे आपल्या भावना दुखावण्याची गरज नाही. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती २५ वर्षे टिकली आहे. पण २०१९ मध्ये राज्यात सरकार स्थापनेवरुन मतभेद झाल्यामुळे युतीमध्ये तेढ निर्माण झाला. यामुळेच दोन्ही पक्ष वेगळे झाले असल्याचे संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा : महाजन, मुंडेंनी युती टिकवली, स्वार्थासाठी युतीमध्ये मिठाचे खडे कुणी टाकले? आशिष शेलारांचा सवाल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -