संयोगिताराजे छत्रपतींच्या ‘त्या’ पोस्टनंतर; राष्ट्रवादीचे आव्हाड, मिटकरीही संतापले

श्रीराम नवमीच्या निमित्ताने संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली. महंतांनी पूजा पुराणेक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. हा सगळा प्रकार संयोगिताराजे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संयोगिताराजे यांच्या या पोस्टनंतर राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

श्रीराम नवमीच्या निमित्ताने संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली. महंतांनी पूजा पुराणेक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. हा सगळा प्रकार संयोगिताराजे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संयोगिताराजे यांच्या या पोस्टनंतर राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही संताप व्यक्त केला. (After post shared by Sanyogitaraje Chhatrapati NCP jitendra awhad and amol mitkari reactions)

संयोगिताराजे छत्रपती यांनी इंस्टाग्रामवर राम नवमीनिमित्त आलेला अनुभव शेअर केला आहे. त्यांची ही पोस्ट ट्वीटवर शेअर करत ‘बर झाले हे छत्रपतींच्या वारसं बरोबर झाले. जे मी सांगत तो हाच सनातनी धर्म आजही ते वर्ण व्यवस्था आहे हे दाखवून देतात. अजुन कुठला पुरावा हवा आजचे छत्रपतींन च्या वारसांना ही वागणूक मिळते तर बिकीच्यांच काय? बहुजनांनो डोळे उघडा हाच तो सनातन धर्म तो तुम्हाला शुद्रच मानतो’, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच, ‘काळाराम मंदिरातील महंतांना छत्रपती शिवराय व शाहू महाराज यांचा करारी बाणा दाखवुन वस्तुस्थिती समाजासमोर मांडल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार’, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.

नेमके काय म्हणाले आव्हाड आणि मिटकरी?

“छ. संयोगिताराजे यांनी काळाराम मंदिरातील महंतांना छत्रपती शिवराय व शाहू महाराज यांचा करारी बाणा दाखवुन वस्तुस्थिती समाजासमोर मांडल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.. प्रत्येकाला राजरोस अनुभव येतात मात्र लिहिण्या बोलण्याचे धाडस मोजके लोक करतात !आपणास मानाचा मुजरा”, असे अमोल मिटकरी म्हणाले.

“काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे भोसले यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्याना सुनावल, छत्रपती मुळे मंदिर राहिली त्यानाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही.? त्यांनीं उत्तर दिले नाही तुम्हाला अधिकार नाही. छत्रपतीं शिवरयान बरोबर सनातनी मनुवादी असेच वागले. छत्रपती संभाजी महाराजांना हीच वागणूक दिली. शाहू महाराजांना शुद्र म्हणाले हेच सनातन मनुवादी आजही छत्रपतींना शुद्र समजतात. बर झाले हे छत्रपतींच्या वारसं बरोबर झाले. जे मी सांगत तो हाच सनातनी धर्म आजही ते वर्ण व्यवस्था आहे हे दाखवून देतात. अजुन कुठला पुरावा हवा आजचे छत्रपतींन च्या वारसांना ही वागणूक मिळते तर बिकीच्यांच काय? बहुजनांनो डोळे उघडा हाच तो सनातन धर्म तो तुम्हाला शुद्रच मानतो”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.


हेही वाचा – नाशिक : काळाराम मंदिरांतील वागणूकीने संयोगिताराजे छत्रपती भडकल्या: म्हणाल्या, हे श्रीरामा…