घरमहाराष्ट्रतरुणीवर बलात्कार करुन केली खंडणीची मागणी

तरुणीवर बलात्कार करुन केली खंडणीची मागणी

Subscribe

पुण्यातील एका १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार करत तीन लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीला खडक पोलिसांनी अटक केली असून ७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुण्यातील कासेवाडी परिसरात एका १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले. याप्रकरणी पीडितेने आरोपीं विरोधात खडक पोलीस ठाण्यात बलात्कार आणि खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपी योगेश गायकवाड याला अटक केली आहे. तसेच आरोपीला ७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींनी पीडित तरुणीचा व्हिडीओ काढून त्याद्वारे अनेक वेळा ब्लॅकमेल आणि खंडणी मागितल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.

नेमके काय घडले?

कासेवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणीवर ऑक्टोबर २०१७ साली बलात्कार केल्याची घटना उघड झाली. पीडित तरुणी आणि आरोपी योगेश गायकवाड एकमेकांना ओळखत होते. योगेश यांनी पीडितीवर बलात्कार करुन त्याचा व्हिडीओ काढला होता. हा व्हिडीओ वायरल करणार अशी सतत तरुणीला तो धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करु लागला. तसेच पीडितीकडे तीन लाखाची खंडणी देखील मागितली. मात्र तरुणीने पैसे देण्यास नकार दिला. अखेर आपली बदनामी होणार या भितीने पाडितीने आपल्या आजोबांच्या नावावर असलेले अडीच लाख रुपये चोरुन योगेशला दिले. पैसे चोरीला गेल्याचे समजताच आजोबांनी नातीकडे चौकशी केली. त्यावेळी आपण पैसे चोरल्याचे पीडितीने मान्य केले.

- Advertisement -

तरुणीचे आजोबा निवृत्त झाल्यामुळे त्यांना पैसे मिळणार अशी माहिती तरुणाला मिळाली. या मिळालेल्या माहितीच्या आधारे तरुणांने पीडितीला भर रस्त्यात अडवून तीन लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाहीस तर व्हिडीओ वायरल करणार अशी धमकी देखील दिली. अखेर या धमकीला बळी पडून पीडितीने योगेशला पैसे देऊ केले. हा घडलेला सर्व प्रकार तरुणींने आजोबांना सांगितला. त्यानंतर आजोबांनी खडक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून योगेश गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर या आधी देखील चार गुन्हे दाखल असल्याची माहिती खडक पोलीस ठाण्याने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -