घरमहाराष्ट्रशरद पवारांच्या निवृत्तीमुळे 'मविआ'वर परिणाम होणार ? जयंत पाटील म्हणाले...

शरद पवारांच्या निवृत्तीमुळे ‘मविआ’वर परिणाम होणार ? जयंत पाटील म्हणाले…

Subscribe

राज्यात एका बाजूला शरद पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना तुर्तास स्थगिती दिली आहे. यामुळे कुठे ना, कुठे तरी महाविकास आघाडीचे भविष्य धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई | शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेणार असल्याची इच्छा व्यक्त केली. शरद पवारांच्या (Sharad Pawar) निवृत्तीचा निर्णय सांगितल्यानंतर सभागृहात गोंधळ झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपासून ते दिग्गज नेत्यांपर्यंत शरद पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. शरद पवारांच्या निर्णयानंतर राज्यासह देशाचे राजकारण ढवळून निघाले. राज्यात एका बाजूला शरद पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना तूर्तास स्थगिती दिली आहे. यामुळे कुठे ना, कुठे तरी महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi) भविष्य धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. राज्यात वाढता उन्हाळा पाहाता वज्रमूठ सभा थांबविण्याची माहिती महाविकास आघाडीचे नेत्यांनी माध्यमांना दिली आहे. मग यावरून महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे का? हाच प्रश्न उभा राहत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात देखील पत्रकारांनी जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार का? असा सवाल केला. यावरुन आपल्या लक्षात येते की, राज्यात कोणतीही मोठी राजकीय घडामोड झाली की, महाविकास आघाडीच्या ऐक्याचा मुद्दा ऐरणीवर येतो. कारण, महाविकास आघाडीतील नेते हे माध्यमांसमोर येऊन आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यात आघाडीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे नाव येते. नुकतेच अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु, अजित पवारांनी भाजपसोबत जाणार नाही, असे म्हणत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. तेव्हा माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘संजय राऊतांनी त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते होऊ नका.’ यानंतर अजित पवार पुणे दौऱ्यावर गेले असताना पत्रकारांनी संजय राऊत यांच्यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, ‘कोण, संजय राऊत मी ओळखत नाही.’ यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत या दोघांमध्ये टीका-टिप्पणी झाली आहे. ‘संजय राऊतांनी चाटूगिरी करू नये. ते काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत’, अशी टीका नाना पटोलेंनी संजय राऊतांवर केली. ‘नाना पटोलेंना त्यांचा पक्ष तरी गांभीर्याने घेतो का? त्यांच्यापेक्षा राहुल गांधी माझ्याशी जास्त बोलतात’, असा टोला राऊतांनी लगावला. या सर्व प्रकरणामुळे महाविकास आघाडी खरंच वज्रमूठ आहे का? असा सवाल सतत राज्यातील जनतेच्या मनात आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – “राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सुरू” काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट; तर संजय राऊत म्हणतात…

शरद पवारांच्या निवृत्तीचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही – जयंत पाटील

- Advertisement -

“शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही”, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिले आहे. शरद पवार हे निवृत्तीच्या निर्णयावर ठाम आहेत, असेही जयंत पाटलांनी दिले. आम्ही पक्ष म्हणून महाविकास आघाडीत आहोत. महाविकास आघाडीला तडा जाणार नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुढे काम करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – नाना पटोलेंपेक्षा राहुल गांधी माझ्याशी जास्त बोलतात; राऊतांचं मोठं विधान

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -