घरमहाराष्ट्ररायगडमधून राज ठाकरेंना मोठा धक्का; 65 आजी- माजी पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटाला पाठींबा

रायगडमधून राज ठाकरेंना मोठा धक्का; 65 आजी- माजी पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटाला पाठींबा

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी उभी फूट पडली. यानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेंतृत्वाखाली शिवसेना -भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. इतकेच नाही तर शिंदे गटाकडून आता खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला जात आहे. याबाबतचा फौसला आता कोर्टात होणार आहे. यात उद्धव ठाकरेंना समर्थन देणारे अनेक आमदार आता शिंदे गटात सामील होत आहे. आत्तापर्यंत अनेक आमदारांसह, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. अशात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रायगडमध्ये कार्यकर्त्यांनी मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पाठोपाठ आता रायगडमधील मनसे पक्षात मोठी फूट पडली आहे.

पनवेल, उरण आणि खारघर भागातील मनसेचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी पक्षातील अंतर्गत वादामुळे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. गेल्या 8 वर्षांपासून ते जिल्हा अध्यक्षपदावर कार्यरत होते. त्यांच्यासह मनसेचे आजी, माजी पदाधिकारी असे एकूण 65 जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाला पाठींबा दिला आहे. तसेच मनसेचे उपतालुका अध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिकारी देखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत. याला मनसे पक्षातील अंतर्गत वाद कारणीभूत आहे.

- Advertisement -

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे – फडणवीस सरकारच्या बाजूने मतदान केले. विधानसभा अध्यक्ष निवडीवेळीच्या विश्वासदर्शक ठरावावेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी राज ठाकरेंच्या आदेशानंतर शिंदे- फडणवीस सरकारच्या बाजूने मतदान केले. तसेच राष्ट्रपती पदाच्या निवडीवेळी देखील मनसेने एनडीएच्या उमेदवाराला मतदान केले. अशा परिस्थितीत आता मनसेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाल्याने मनसे आणि शिंदे गटात नव्या राजकीय वादाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज ठाकरेंची प्रतिक्रिया काय?

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर हे शक्यच झाले नसते. अशा शब्दात राज ठाकरेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांना टोला लगावला आहे. तसेच शिवसेना फुटल्याचे श्रेय भाजपने घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंचेंच आहे, माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले होते मी त्यांना म्हटले उगाच फुकटचे श्रेय नका घेऊ नका, जी गोष्ट घडली आहे ती गोष्ट नाही तुम्ही घडवली, ना अमित शहांनी घडवली, ना भाजपने घडवली, ना अजून कोणी घडवली. याचे श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावे लागेल, जी गोष्ट घडली त्याचे श्रेय कसे काय काढून घेऊ शकता? कारण त्यांच्यामुळे हे काय एकदा घडले नाही, अस राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

 

संजय राऊतप्रकरणी ईडीकडून आणखी दोन ठिकाणी छापे, अनेकांना बजावले समन्स


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -