घरमहाराष्ट्रग्रामपंचायत निवडणुकीतील यशानंतर महायुतीचा आत्मविश्वास वाढला, 'एवढ्या' जागा जिंकण्याचा सेनेचा दावा

ग्रामपंचायत निवडणुकीतील यशानंतर महायुतीचा आत्मविश्वास वाढला, ‘एवढ्या’ जागा जिंकण्याचा सेनेचा दावा

Subscribe

महायुतीमधील नेत्यांकडून आणि मंत्र्यांकडून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांबाबत वेगवेगळे मत व्यक्त करत सर्वाधिक जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी महायुती आगामी लोकसभा निवडणुकीत 45 तर विधानसभा निवडणुकीत 215 जागा जिंकेल असा विश्वास केला आहे.

मुंबई : राज्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. तर महायुतीने 2359 जागांपैकी समर्थन दिलेल्या पॅनेलनी 1400 हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे या यशानंतर महायुतीमधील नेत्यांचा आत्मविश्वाच चांगलाच वाढलेला दिसत आहे. ज्यामुळे आता महायुतीमधील नेत्यांकडून आणि मंत्र्यांकडून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांबाबत वेगवेगळे मत व्यक्त करत सर्वाधिक जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी महायुती आगामी लोकसभा निवडणुकीत 45 तर विधानसभा निवडणुकीत 215 जागा जिंकेल असा विश्वास केला आहे. ( After success in Gram Panchayat elections, Mahayuti’s confidence increased)

हेही वाचा – शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात, केला ‘इतक्या’ जागांवर दावा 

- Advertisement -

याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत आपण पाहिले की, 2300 ग्रामपंचायतींपैकी 1400 पेक्षा जास्त सरपंच हे महायुतीचे निवडून आले. 450 जे इतर सरपंच निवडून आले आहेत. त्यापैकी 125 ते 150 सरपंच हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तर तेवढेच सरपंच भाजपा आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. ग्रामीण भागातील जनतेने महायुतीला स्वीकारलेले आहे. त्याच्यामुळे खासदारकी आणि आमदारकी आमच्यादृष्टीने फार सोपी आहे. लोकसभेमध्ये आम्ही 45 जागा जिंकू आणि विधानसभेच्या 215 जागा आम्ही जिंकू, असे मत उदय सामंत यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.

तसेच, निधिवाटपावरून कोणी नाराज असेल असे मला वाटत नाही. महायुतीमध्ये गैरसमज निर्माण व्हावा. महायुतीतील घटक पक्षांमध्ये दुरावा निर्माण व्हावा, असे यामधून काही लोकांना वाटते. मात्र असे काहीही होणार नाही, असेही निधी वाटपावरून नाराजीच्या प्रश्नावर उदय सामंत यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे. मात्र, सध्या महायुतीत जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. एकीकडे महायुतीच्या नेत्यांकडून सर्वाधिक जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत असताना दुसरीकडे मात्र, शिंदे गटातील दोन ज्येष्ठ मंत्र्यांमध्येच जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीत जागा वाटपाबाबत नेमका काय निर्णय होतो?, कोणाला किती जागा मिळतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -