घरमहाराष्ट्रसुप्रिया सुळेंनंतर मुंडेंनाही हवाय राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री

सुप्रिया सुळेंनंतर मुंडेंनाही हवाय राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री

Subscribe

सुप्रियी सुळे (Supriya Sule) यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजा भवानी देविचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांनी देवीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री (Chief Minister) होऊ दे, आख्खा पक्ष घेऊन दर्शनाला येईन असा नवस केला होता. यावरुन महविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु आहे. यानंतर आता धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलत याबाबत एक वक्तव्य केले आहे.

हेही वाचा – राज्यसभा निवडणुकीत शरद पवार १९९८ ची पुर्नरावृत्ती करणार का?, पवारांनी दाखवला होता काँग्रेसच्या उमेदवाराला कात्रजचा घाट

- Advertisement -

मुख्यमंत्री आपलेच असतील –
साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना  पवार साहेबांनी माझ्यावर विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिली होती. पाच वर्ष विरोधी पक्ष नेता म्हणून मी ती जबाबदारी पार पाडली. कितीही मजबूत सरकारी पक्ष असला तरी त्याला गदागदा हलवायचे काम मी केले. आज शब्द देतोय.. सामाजिक न्याय व विशेष विभागाचा मंत्री म्हणून.. येणाऱ्या काळात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्रीपद द्यायचे कुणाला? जे कुणी मुख्यमंत्री असतील … ते आपलेच असतील ते म्हणतील हा विभाग आपल्या शिवाय दुसऱ्या कोणाला नको. एवढी प्रतिष्ठा या विभागाला प्राप्त करूण द्याचे कामी मी करेण असा शब्द तुम्हाला देतो, असे धनंजय मुंडे म्हणाले.

सुप्रिया सुळेंचा नवस –
राज्यात अजूनपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झालेला नाही. राज्यात दिवसेंदिवस राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. अंबाबाईच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया –

यावर वास्तवतेत जगूया, आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. महाविकास आघाडीचं सरकार अतिशय उत्तम काम करतयं, पण प्रत्येक पक्षाला, आपला मुख्य़मंत्री व्हावा, हे वाटणं यात गैर काय? माझं मत आहे, ताटाचं वाटीत आणि वाटीचं ताटात. महाविकास आघाडी सरकार आहे यातील तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्री पदाच्या मागे न लागता, सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही तिघं एकत्र आलोत, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

हेही वाचा –  अपक्ष आणि इतर पक्षांना फोडण्यासाठी भाजपा ईडी, सीबीआयची भीती दाखवतेय; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मनसेची टीका –

यावर पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल-धनंजय मुंडे संजय राऊत व त्यांच्या सेनेने काय धूनी भांडी करायची का मग तुमची ? हा टोमणे सेनेचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे.आणि तो सहन केला जाणार नाही. खंजीर,कोथळा,वाघनखे,मर्द,मावळा सह उद्याचा टोमणे अग्रलेख वाचा. अर्थात दै.सामना नव्हे टोमणा, अशी टीका मनसेने मंत्री धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानंतर शिवसेनेवर केली.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -