Corona Vaccination: २० ते २५ लाख लसीचा उपलब्ध झाल्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू करणार – राजेश टोपे

After the availability of 20 to 25 lakh vaccines, vaccination will be started in the age group of 18 to 44 years
Corona Vaccination: २० ते २५ लाख लसीचा उपलब्ध झाल्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू करणार - राजेश टोपे

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारने १५ दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्याने १ मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. पण राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. २० ते २५ लाख लसीचा उपलब्ध झाल्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

राजेश टोपे म्हणाले, ‘केंद्र सरकारने १ मेनंतर १८ वर्षांवरील व्यक्तीचे लसीकरण करण्यास सांगितले आहे. लसीचे डोस मिळणे अतिशय कठीण झाले आहे. कोविशिल्ड ३ लाख लसीचा पीओ (पर्चेस ऑर्डर) पाठवला आहे. त्यामुळे ३ लाखांनी काय होणार?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्यावेळी आपापल्या २० ते २५ लाख डोस एकत्रितपणे मिळतील त्या दिवशी आपण १८ वर्षांवरील व्यक्तीचे लसीकरण सुरू करू. पण त्यासाठी ज्या काही ऑर्डर असतील त्या ऑर्डर त्वरेने दिल्या जातील. अशी चर्चा बैठकीत करण्यात आली.’

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे दर झाले कमी 

सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्डचे दर ४०० रुपयांऐवजी ३०० रुपये करण्यात आले आहे. तर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचे दर राज्य सरकारसाठी जो ६०० रुपये होतो, तो आता ४०० रुपये केला आहे. त्यामुळे दर कमी केल्याने राज्याला, सर्व खासगी हॉस्पिटलला आणि जनतेला आधार मिळाला आहे.


हेही वाचा – Corona Third Wave: राज्यात जुलै-ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट, तयारीवर टोपे म्हणाले…