Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्र्यांचेही सर्वपक्षीयांना फोन

पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्र्यांचेही सर्वपक्षीयांना फोन

Subscribe

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना देवेंद्र फडणवीसांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षिय नेत्यांना फोनवरून विनंती केल्याचे सांगितले.

‘मी स्वत:ही काही प्रमुख नेत्यांशी फोनवरून पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे मला वाटते की, या विनंतीला निश्चित नेते सकारात्मक प्रतिसाद देतील. तसेच, निवडणुका बिनविरोध करतील’, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (After the Chief Minister the Deputy Chief Minister also appealed to all parties over the phone to make the by-election unopposed)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना देवेंद्र फडणवीसांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षिय नेत्यांना फोनवरून विनंती केल्याचे सांगितले.

- Advertisement -

“मी स्वत:ही काही प्रमुख नेत्यांशी फोनवरून पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्याच प्रमुख नेत्यांशी बोलत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित नेत्यांशी बातचीत करून विनंती केली आहे. त्यामुळे मला वाटते की, या विनंतीला निश्चित नेते सकारात्मक प्रतिसाद देतील. तसेच, निवडणुका बिनविरोध करतील”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

“खरं तर आगामी निवडणुकांसाठी वर्ष ते दीड वर्षाचा कालावधी राहिला आहे आणि असे असताना निवडणुका न झालेल्या सर्वांसाठीच योग्य आहेत. त्यामुळे मला वाटते की, नेतेमंडळी नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देतील”, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisement -

अजित पवारांनी पुन्हा एकदा विचार करावा

“कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुक लढवल्यास आम्हीही लढवणारच आहोत. परंतु, अजित पवार यांनी पुन्हा एकदा विचार करावा. कारण विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी जेव्हा त्यांनी विनंती केली होती, तेव्हा त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आमचा उमेदवार मागे घेतला होता. त्यामुळे त्यांनीही विचार करणे गरजेचे आहे”, असे फडणवीसांनी सांगितले.

के.सी.आर. यांनी तेलंगणातील आपले सरकार वाचवावे आणि मग महाराष्ट्रात व देशात यावे

“पहिल्यांजा के.सी.आर. यांनी तेलंगणामध्ये स्वत:चे सरकार वाचवले पाहिजे. आता तेलंगणातली परिस्थिती पाहिली तर, भारतीय जनता पक्षाचा सातत्याने विजय होत आहे. तसेच, ज्या निवडणुकांमध्ये त्यांनी प्रेस्टिजबाबत इश्यू केला, त्याही निवडणुका भारतीय जनता पक्ष पोटनिवडणुकीमध्ये जिंकल्या आहेत. त्यामुळे तेलंगणातली विधानसभेची निवडणूक होणार असून, तिथेही भाजपाचाच विजय होईल”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, “के.सी.आर. यांनी तेलंगणातील आपले सरकार वाचवावे आणि मग महाराष्ट्रात व देशात यावे. ही लोकशाही असून, कोणालाही कुठेही सभा घेण्याचा अधिकार आहे. सगळे स्वप्न पाहत असतात, पण काही स्वप्न खरी होत नसतात”, असा सल्लाही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.


हेही वाचा – गाडीमध्ये घुसला पत्रा, पण आजी-आजोबा सुखरूप; मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -