घरमहाराष्ट्रपुणेखडकवासला धरणात २ मुलींच्या मृत्यूनंतर पर्यटकांसह स्थानिकांना बंदी; जलसंपदा विभागाच्या सूचना

खडकवासला धरणात २ मुलींच्या मृत्यूनंतर पर्यटकांसह स्थानिकांना बंदी; जलसंपदा विभागाच्या सूचना

Subscribe

खडकवासला धरण परिसरात नियमावलीचे फलक लावून येथे १० पोलीस तैनात करण्यात आले आहे.

मुंबई | पुण्याच्या खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) नऊ मुली बुडाल्याची घटना सोमवारी घडली. यात सात मुलींना वाचवण्यात यश आले तर, दोन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पुण्यातील जलसंपदा विभागाने पर्यटकांनासह (Tourists) स्थानिकांना खडकवासला धरणात उतरण्यास बंदी घातली आहे. हा नियम मोडल्यास ५०० रुपये दंडासह कठोर कारवाई केली जाणार आहे, असा इशाराही जलसंपदा विभागाने (Water Resources Department) पर्यटकांनासह स्थानिकांना दिला आहे.

दरम्यान, खडकवासला धरण परिसरात नियमावलीचे फलक लावून येथे १० पोलीस तैनात करण्यात आले आहे. शनिवारी-रविवारी खडकवासला धरण आणि सिंहगड किल्ला पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. त्याचबरोबर महाविद्यालयातील मुले-मुली उन्हाळ्याच्या सुट्टी असल्यामुळे खडकवासला धरणाच्या चौपाटीवर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. अनेक वेळा उत्साही पर्यटक धरणात पोहण्याचा प्रयत्न करतात.

- Advertisement -

तशीच घटना सोमवारी खडकवासला धरणात घडली होती. नऊ मुली धरणात पोहण्यासाठी गेल्या होत्या. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने नऊ मुली धरणात बुडाल्या. यावेळी स्थानिक रहिवासी संजय माताळे यांच्या प्रसंगावधानामुळे ७ मुलींना वाचविण्यात यश आले आहे पण, दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून पुन्हा अशी घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.

हेही वाचा – पुण्याच्या खडकवासला धरणामध्ये ९ मुली बुडाल्या; ७ मुलींना बाहेर काढण्यात यश तर २ मुलींचा मृत्यू

- Advertisement -

धरणाच्या मागील बाजूने पर्यटन पाण्यात उतरतात – खडकवासला पाटबंधारे विभाग 

या धरणाजवळ चौपाटी असलेल्या भागात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाच्या सहाय्याने नुकतेच जाळ्या बसविल्या आहेत.  या धरणाचे पाणलोट क्षेत्र मोठे असल्याने पर्यटक धरणाच्या मागील बाजूने पाण्यात उतरतात. यामुळे दुर्दैवी घटना घडल्या आहेत. धरणाच्या मागील बाजूने पाण्यात उतरण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -