घरक्रीडाअजित पवार यांच्या प्रयत्नानंतर महाराष्ट्रातल्या 'या' खेळाडूंना मिळाला न्याय

अजित पवार यांच्या प्रयत्नानंतर महाराष्ट्रातल्या ‘या’ खेळाडूंना मिळाला न्याय

Subscribe

गेल्यावर्षी गुजरात येथे 27 सप्टेंबर ते 12 आक्टोबर 2023 या कालावधीत झालेल्या ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022’ मध्ये महाराष्टा्रतल्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात 39 सुवर्ण, 38 रौप्य व 63 कास्यपदाकांसह एकूण 140 पदकांची लयलूट केली होती.

मुंबई | गेल्यावर्षी सप्टेंबर-आक्टोबर महिन्यात गुजरात येथे झालेल्या ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022’मध्ये (National Sports Competition 2022) महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करत तब्बल 140 पदकांची लयलूट केली होती. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना राज्य सरकारने घोषित केलेली पारितोषिकाची रोख रक्कम अद्याप मिळालेली नव्हती. यासंबधी महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे (Maharashtra Olympic Association) अध्यक्ष तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवत सरकारला धारेवर धरले होते. यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन सरकारच्यावतीने देण्यात आले होते. अखेर आठ महिन्यानंतर गुजरात येथे झालेल्या ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022’ मधील यशस्वी खेळाडूंच्या खात्यात पारितोषिक रक्कम जमा करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मागणीला यश आले असून खेळाडूंसह त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना पारितोषिकाची रक्कम मिळणार आहे.

 

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी, राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्यासाठी तसेच राज्यातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालिन आघाडी सरकारच्यावतीने सन 2012 साली राज्याचे स्वतंत्र क्रीडा धोरण तयार केले होते. स्वतंत्र क्रीडा धोरण करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिलेच राज्य ठरले होते. या क्रीडा धोरणानुसार राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना रोख बक्षिस देऊन गौरविण्यात येत होते. गेल्यावर्षी गुजरात येथे 27 सप्टेंबर ते 12 आक्टोबर 2023 या कालावधीत झालेल्या ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022’ मध्ये महाराष्टा्रतल्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात 39 सुवर्ण, 38 रौप्य व 63 कास्यपदाकांसह एकूण 140 पदकांची लयलूट केली होती. मात्र सहा महिने उलटून गेले तरी खेळाडूंना कोणत्याही प्रकारची रोख रक्कम मिळालेली नव्हती तसेच त्यांचा गौरव सुध्दा करण्यात आलेला नव्हता. या विषयी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पिय अधिवेशनात आवाज उठवत सरकारला धारेवर धरले होते. यावर उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. अखेर आठ महिन्यानंतर गुजरात येथे झालेल्या ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022’ मधील यशस्वी खेळाडूंच्या खात्यात पारितोषिक रक्कम जमा करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मागणीला यश आले असून खेळाडूंना पारितोषिकाची रक्कम मिळणार आहे. यामुळे खेळाडूंच्यात आणि त्यांच्या मार्गदर्शकांच्यात आनंदाचे वातावरण असून खेळाडू विरोधी पक्षनेत्यांना धन्यवाद देत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -