गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधी शेगावात घेणार जाहीर सभा, मनसेकडून निषेध

राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रा थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आजच्या यात्रेत नाना पटोले, मुकुल वासनिक, भाई जगताप, नसीम खान, सुनील केदार, मिलिंद देवरा, दिपेंद्र सिंग गुड्डा आदी अनेक वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत.

bharat jodo

अकोला – राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) आज अकोल्यातील कुपट बाळापूर येथून पदयात्रेला सुरुवात झाली आहे. भारत जोडो यात्रेचा आजचा ७२ वा दिवस असून, महाराष्ट्रातील १२ वा दिवस आहे. तसंच, विदर्भात यात्रेचा चौथा दिवस आहे. आज ही यात्रा बुलडाण्यात प्रवेश करणार आहे. तर, सायंकाळी चार वाजता राहुल गांधी शेगावच्या गजानन महाराजांचे (Gajanan Maharaj in Shegao) दर्शन घेऊन साडेसहाच्या दरम्यान जाहीर सभा घेणार आहेत.

हेही वाचा – सावरकरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यापासून बरीच चर्चेत आहे. तसंच, त्यांनी सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली आहे. काँग्रेस महाविकास आघाडीत असल्याने या आघाडीतील दोन पक्षांची वेगवेगळी विचारधारा असल्याने भाजपाने महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. तसंच, राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रा थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आजच्या यात्रेत नाना पटोले, मुकुल वासनिक, भाई जगताप, नसीम खान, सुनील केदार, मिलिंद देवरा, दिपेंद्र सिंग गुड्डा आदी अनेक वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत.

हेही वाचा – सौ सुनार की… एका वादाने दिला सर्व राजकीय ‘तू तू मैं मैं’ला धोबीपछाड!

मनसे दाखवणार झेंडे

राहुल गांधी यांनी सावरकरांविरोधता वक्तव्य केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आदेश दिले आहेत. राहुल गांधी यांच्या शेगावातील यात्रेत त्यांचा निषेध करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. यासाठी अनेक मनसैनिक शेगावात पोहोचले असून त्यांच्या यात्रेत काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करणार आहेत.

आम्ही फुलं देऊ

मनसेकडून काळे झेंडे दाखवण्यात येणार असल्याचं नाना पटोलेंना विचारले असता ते म्हणाले की, त्यांनी आम्हाला काळे झेंडे दाखवले तर आम्ही त्यांना फुलं देऊ. मनसेने कितीही विरोध केला तरीही यात्रा रोखता येणार नाही, हे राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यात्रा कोणीही थांबू शकणार नाही. शेगावच्या सभेसाठी काँग्रेसची मोठी तयारी झाली आहे. मोठ्या संख्येने तिथे कार्यकर्ते पोहोचणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा – शिंदे गट आक्रमक; ‘जोडे-मारो आंदोलन’ करत नोंदवला राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध