संजय शिरसाटांविरोधात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक, फोटोला फासले काळे

Protest Against Sanjay Shirsat | महिला उपनेत्यांविषयी अवार्च्य भाषेत टिका झाल्याने ठाकरे गटातील महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या आहेत. संजय शिरसाटांच्या घराबाहेर महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडले. संजय शिरसाटांच्या प्रतिमेला काळंही फासण्यात आलं आहे.

sanjay shirsat
Protest Against Sanjay Shirsat

Protest Against Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर – शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्यावर अर्वाच्य भाषेत टिका केल्यानंतर आता ठाकरे गटातील महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांना संजय शिरसाटांविरोधात आंदोलन करत त्यांच्या प्रतिमेला काळे फासले आहे.

हेही वाचा – संजय शिरसाटांविरोधात सुषमा अंधारेंची महिला आयोगात धाव

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंवर गलिच्छ भाषेत टीका केला होती. “ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत. अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही उरलेले लोक टाळ्या वाजवत आहेत”, असं संजय शिरसाट म्हणाले होते. ते छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना मेळाव्यात बोलत होते. संजय शिरसाटांच्या याच वक्तव्यावरून सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. संजय शिरसाटांविरोधात त्या तक्रार दाखल केली आहे. संजय शिरसाटांविरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणीही अंधारे यांनी केली आहे. तसंच, संजय शिरसाटांवर त्या अब्रुनुकसानीचा दावाही ठोकणार आहेत.

याबाबत माहिती देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “संजय शिरसाट या विकृत आमदाराने वापरलेली भाषा ही व्यक्तीशः मलाच नाही तर एकूणच महिला वर्गाच्या मनात लज्जा उत्पन्न करणारी आणि बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी भाषा आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेतल्याने मी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.”

दरम्यान, महिला उपनेत्यांविषयी अवार्च्य भाषेत टिका झाल्याने ठाकरे गटातील महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या आहेत. संजय शिरसाटांच्या घराबाहेर महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडले. संजय शिरसाटांच्या प्रतिमेला काळंही फासण्यात आलं आहे.

अंबादास दानवे पोलिसांत तक्रार करणार

सुषमा अंधारे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. शिरसाट यांचं वक्तव्य गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून क्रिमिनल लॉमध्ये बसणारे आहे. त्यामुळे, छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार देणार असून कायदेशीर प्रक्रियेत कोणता गुन्हा दाखल होतो हेही पाहणार आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.