Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम संतापजनक: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून युवतीवर केले अघोरी अत्याचार

संतापजनक: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून युवतीवर केले अघोरी अत्याचार

८० कोटी रूपयांचा पैशांचा पाऊस पाडू अशा प्रकारचे आमिष दाखवून मांत्रिकाने युवतीवर आत्याचार केला.

Related Story

- Advertisement -

झटपट पैसे कमवायच्या हव्यासापोटी अनेकजन चुकीच्या मार्गाचा अवलंब करताना दिसतात तसेच त्याचे वाईट परिणामही त्यांना भोगावे लागतात. अशाच प्रकारे चुकीच्या मार्गाचा अवलंब करून पैशांचा पाऊस पडण्याचे आमिष दाखवून एका युवतीचा शारीरिक तसेच मानसिक छळ केल्याची खळबळजनक घटना वर्धा जिल्हयामधून समोर आली आहे. अघोरी पूजा करून चक्क ८० कोटी रूपयांचा पैशांचा पाऊस पाडू अशा प्रकारचे आमिष दाखवून मांत्रिकाने युवतीवर आत्याचार केला. विशेष बाब म्हणजे मांत्रिकाकडून होणार्‍या कट-कारस्थाना मध्ये युवतीची आई व काका हे सहभागी असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. युवतीला विवस्त्र करून तिच्यासोबत वारंवार घृणास्पद प्रकार करण्यात येत असे. या जाचाला वैतागून युवतीने संधी साधून तात्काळ तेथून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब गुन्हा दाखल करून मांत्रिक बालू उर्फ प्रवीण मंगरूळकर,किशोर सुपारे तसेच या गुन्ह्यामध्ये सहभागी असणार्‍या लोकांना अटक केली आहे.घडलेल्या घटनेचा प्रकार उघडकीस आल्यावर युवतीच्या आईने झालेल्या प्रकारची कबुली दिली आहे. युवतीच्या आईच्या ओळखीच्या महिलेने पैशांचा पाऊस पडणारा मांत्रिक असल्याचे संगितले  होते. आणि या लालसेला बळी पडून युवतीला अनेक ठिकाणी अघोरी पूजा करण्यात घेऊन जाण्यात येत असे. युवतीच्या शरीरात अतृप्त आत्मा सोडून पैशांचा पाऊस पाडू असे मांत्रिका तर्फे दावा करण्यात आला होता. सध्या गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी संगितले या सर्व घटनेमध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही पोलिसांना मदत केल्याचेही सांगण्यात आले.


- Advertisement -

हे ही वाचा – ऑक्सिजन अभावी रूग्णांचा जीव धोक्यात

 

- Advertisement -