घरदेश-विदेशशेतकरी पुन्हा उतरणार रस्त्यावर! 26 जानेवारीला देशव्यापी आंदोलनावर घेणार निर्णय

शेतकरी पुन्हा उतरणार रस्त्यावर! 26 जानेवारीला देशव्यापी आंदोलनावर घेणार निर्णय

Subscribe

देशभरातील शेतकरी पुन्हा आपल्या विविध मागण्या, प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे. यात संयुक्त किसान मोर्चा पुन्हा अधिक आक्रमक झाला आहे. 26 जानेवारीला संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या आधी म्हणजे 25 जानेवारी रोजी महाराष्ट्रातही या आंदोलनाचे समर्थन करत आंदोलन केले जाईल. तर 26 जानेवारीला पुन्हा शेतकरी आंदोलनाची सुरुवात होईल. महाराष्ट्रात संयुक्त किसान मोर्चात सहभागी संघटनांची एक महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीत पुन्हा एकदा देशव्यापी मोर्चासंदर्भात निर्णय घेण्यात आला.

यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव, देशव्यापी कर्जमुक्ती, जमीन अधिकारी आणि वीज विधेयक अशा प्रश्नांवर आणि काही प्रमुख मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यारं उपसले आहे. 26 जानेवारीला हरियाणातील जिंद येथे शेतकऱ्यांची भव्य महापंचायत घेत देशव्यापी आंदोलनाची दिशी ठरवली जाणार आहे. या आंदोलनादरम्यान पुन्हा ट्रॅक्टर रॅली, मोर्चे, निदर्शने आयोजित केली जातील, या आंदोलनात केवळ महाराष्ट्र, पंजाब, हरियाणातीलचं नाही तर देशातील विविध राज्यांतील शेतकरी सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा

महाराष्ट्रात खरीप हंगाम वाया गेल्याने आता शेतकरी अडचणीत सापडेल आहे. राज्यात शेतकऱ्यांनी यंदा 1 कोटी 41लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी केली होती. मात्र गोगलगाईचा प्रार्दुभाव, वाणी आळीचा हल्ला, येलो मॉझ्याक, अतिवृष्टी अशा अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच उभं पिक नष्ट होत आहे. यात काही शिल्लक पिकांवर परतीचा पावसाने हल्ला केला. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार,राज्यात पहिल्याच टप्प्यात 29 लाख हेक्टर पिकं पावसाने खराब झाली. याचा राज्यभरात 40 लाख हेक्टर पिकांना फटका बसला. यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायवा, अशी भूमिका किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी मांडली.

त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ओला दुष्काळ, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना, जमीन अधिग्रहण, वनाधिकार, अन्न सुरक्षा, पेंशन, शेतीमालाचे भाव, दूध एफ.आर.पी., यासारखे प्रश्न तीव्र होत आहे. शेतीचा उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे, मिळकत घटत असल्यानं राज्यातील शेतकरी नैराश्याने आत्महत्या करत आहेत. परंतु राज्यातील भाजप-शिंदे सरकार महापुरुषांचा अवमान, धार्मिक द्वेषाचे मुद्दे उपस्थित करून शेती, शेतकरी व श्रमिकांचे प्रश्न बाजूला सारण्यासाठी नियोजनबद्ध कारस्थाने करत असल्याचे अजित नवले म्हणाले.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंचे पक्षप्रमुखपद धोक्यात; २३ जानेवारीला पदाचा कार्यकाळ संपणार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -