Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Agriculture: तांदूळ लागवड जोमात; तर तेलबिया, डाळींच्या लागवडीत घट

Agriculture: तांदूळ लागवड जोमात; तर तेलबिया, डाळींच्या लागवडीत घट

Subscribe

देशात यावर्षी भात लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात यावर्षी खरीपाच्या लागवडीत वाढ झाली आहे. आतापर्यंत देशात 1 हजार 88 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. यामध्ये तांदूळ लागवड अधिक आहे. आतापर्यंत 403.41 लाख हेक्टर क्षेत्रावर तांदळाची लागवड झाली आहे

देशात यावर्षी भात लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात यावर्षी खरीपाच्या लागवडीत वाढ झाली आहे. आतापर्यंत देशात 1 हजार 88 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. यामध्ये तांदूळ लागवड अधिक आहे. आतापर्यंत 403.41 लाख हेक्टर क्षेत्रावर तांदळाची लागवड झाली आहे.( Agriculture Rice cultivation is vigorous So the cultivation of oilseeds and pulses decreased )

तेलबियांसह डाळींच्या लागवडीत घट

कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीच्या डाळींच्या लागवडीत घट झाली. यावर्षी 119.91 लाख हेक्टर क्षेत्रावर डाळींची लागवड करण्यात आली आहे. तर मागील वर्षी 131.17 लाख हेक्टर क्षेत्रावर डाळींची लागवड करण्यात आली होती. तुरीच्या लागवडीतदेखील घट झाली आहे. यावर्षी 42.92 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात आली आहे. तर मागील वर्षी 45.61 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात आली होती. उडीदाटी 31.89 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. तर 31.11 लाख हेक्टर क्षेत्रावर मुगाची लागवड करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे.

- Advertisement -

तेलबियांच्या लागवडीत देखील थोडी घट झाली आहे. यावर्षी 191.49 लाख हेक्टर पेरणी झाली आहे. मागील वर्षी 193.30 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

भरड धान्य आणि नाचणीसह मका लागवडीत वाढ

केंद्रीय कृषी मंत्रालयानं यावर्षीच्या पिकांच्या लागवडीची माहिती दिली आहे. यामध्ये भरड धान्याच्या लागवडीतदेखील थोडी वाढ झाली आहे. यावर्षी 182 लाख हेक्टर क्षेत्रावर भरड धान्याची लागवड झाली आहे. तर 59.91 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे.

- Advertisement -

तसंच, यावर्षी 14.08 लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीच्या लागवड करण्यात आली आहे. मागच्या वर्षी 15.58 लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड करण्यात आली होती. बाजरीच्या लागवडीत मात्र किंचीत वाढ झाली आहे. यावर्षी 70.84 लाख हेक्टर क्षेत्रावर बाजरीची लागवड करण्यात आली आहे. मागच्या वर्षी 70.46 लाख हेक्टर क्षेत्रावर बाजरीची लागवड करण्यात आली होती. नाचणी 8.73 लाख हेक्टर, मका 83.33 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत मका लागवडीत वाढ झाली आहे. मागील वर्षी 80.97 लाख हेक्टर क्षेत्रावर मकेची लागवड झाली होती.

(हेही वाचा: मोदींनी जग जिंकून काय फायदा? मराठा आरक्षणावरून ठाकरे गटाचा मुख्ममंत्र्यांवर निशाणा )

- Advertisment -