घरमहाराष्ट्रपुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी होणार महिलांचा सन्मान

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी होणार महिलांचा सन्मान

Subscribe



मुंबईः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी म्हणजे येत्या ३१ मे  रोजी राज्यातील ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येकी दोन कर्तबगार महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय महिला आणि बालविकास विभागाने घेतला असून मंगळवारी यासंदर्भांतील शासन निर्णय  जारी करण्यात आला.

या निर्णयानुसार महिला आणि बालविकास क्षेत्रात किमान तीन वर्षाहून अधिक काळ काम केलेल्या प्रत्येकी दोन महिलांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल आणि श्रीफळ तसेच रोख ५०० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

- Advertisement -

ग्रामपंचायत सरपंचांच्या अध्यक्षतेखालील समिती गावातील दोन कर्तबगार महिलांची पुरस्कारासाठी निवड करील. या समितीत ग्रामसेवक, पोलीस पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा समावेश असेल. पुरस्कार कार्यक्रमासाठी अंदाजे दोन हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा खर्च जिल्हा परिषदांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला आणि बालकल्याण समितीने राबवयाच्या योजनांमधून करण्यात येणार असल्याचे निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

बेस्टची बस सेवा नवी मुंबई ते कफ परेड सुरू करावी अशी मागणी लक्षात घेता याबाबत स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत. आज 909 तक्रारी आज दाखल झाल्या असून जागीच 132 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे उर्वरीत तक्रारींचे देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले.

- Advertisement -

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.

अंधेरी गुंदवली येथील के ईस्ट वॉर्ड येथे दिनांक 10 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम 31 मे 2023 पर्यंत दुपारी 3 ते 5.30 या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -