घरमहाराष्ट्रछावण्या नसतील तर जनावरे पाहुण्यांकडे पाठवा - राम शिंदे

छावण्या नसतील तर जनावरे पाहुण्यांकडे पाठवा – राम शिंदे

Subscribe

पाथर्डीमध्ये दुष्काळ पडला तर जनावरे पाहुण्यांकडे सोडा असा अजब सल्ला राम शिंदे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला आहे. राम शिंदे यांनी हे विधान करून शेतकऱ्यांची जाहिर थट्टा केली आहे त्यामुळे निषेध केला जात आहे.

राज्यामध्ये सध्या सगळीकडे दुष्काळ परिस्थिती आहे. दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी चिंतेत आले आहे आणि अशातच राज्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. अहमदनगरच्या पाथर्डीत चारा छावणी विषयी काही नागरिक जलसंधारण मंत्री आणि पालकमंत्री राम शिंदेसमोर समस्या मांडत होते. त्यावेळी त्यांनी या शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला आहे. छावण्या नसतील तर जनावरे पाहुण्यांकडे पाठवा असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. राज्यमंत्र्यांनीच शएतकऱ्याची जाहीर थट्टा केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. राम शिंदे यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऐन दुष्काळात राज्यमंत्र्यांचे अजब वक्तव्य, छावण्या नसतील तर जनावरे पाहुण्यांकडे पाठवा

ऐन दुष्काळात राज्यमंत्र्यांचे अजब वक्तव्य, छावण्या नसतील तर जनावरे पाहुण्यांकडे पाठवा | #MyMahanagar

Posted by My Mahanagar on Wednesday, 5 December 2018

- Advertisement -

पाथर्डीत दुष्काळ जाहीर करा

अहमनदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये दुष्काळ परिस्थिती आहे. शेतीला पाणी नाही तर जनावरांना चारा येणार कुठून त्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहे. जनावरांना चारा छावणीत पाठवावे तर चारा छावणी नाही. त्यामुळे पाथर्डी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी काही नागरिकांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी शेतकरी त्यांच्या समस्या मांडत होते. त्यावेळी पाथर्डीमध्ये दुष्काळ पडला तर जनावरे पाहुण्यांकडे सोडा असा अजब सल्ला राम शिंदे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला आहे. राम शिंदे यांनी हे विधान करून शेतकऱ्यांची जाहिर थट्टा केली आहे त्यामुळे निषेध केला जात आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि सिंचन घोटाळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -