घरCORONA UPDATEगायीला खायला घातलं गाजर, त्यामुळे गेला असता गायीचा जीव कारण...

गायीला खायला घातलं गाजर, त्यामुळे गेला असता गायीचा जीव कारण…

Subscribe

एका शेतकऱ्याने आपल्या गायी रक्त वाढावे म्हणून गाजर खायला दिले मात्र त्यामुळे गाय मरता मरता वाचली आहे. अहमदनगरमधील अकोले तालुक्यात हा प्रकार घडला. एका शेतकऱ्याने गाय अजारी असल्याने त्यांनी डॉ. संतोष वाकचौरे यांच्याकडून उपचार करून घेतले. उपचारानंतर गाय बरी होत होती. चारा खाऊ लागली होती. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. डॉक्टरांनी गायीच्या अंगातील रक्त कमी झाल्याचे सांगितले. त्यामुळे तिने चारा खायला सुरवात केल्याने शेतकऱ्याने तिला मका, घास सोबत गाजरही खायला दिले. गाजरामुळे रक्त वाढावे, अशी त्याची अपेक्षा होती.  मात्र या गाजरामुळे गायीचा जीव गेला असता. संध्याकाळी गायीची प्रकृती आणखीच बिघडली. लाळ गाळू लागली. गायीला श्वासही घेता येईना. तेव्हा त्यांनी पुन्हा डॉक्टरांशी संपर्क केला.

गाईला श्वास घ्यायला त्रास होत होता, पोट फुगलेले दिसत होते. तपासणी करताना गायीला काय खाऊ घातले, हे विचारल्यावर गाजर खाऊ घातल्याचे कळाल्यावर डॉक्टरांना शंका आली. त्यांनी तोंडातून हात घातला, पण काही लागले नाही. मग मानेजवळ तपासून पाहिले. तेथे काही तरी अडकल्याचा संशय होता. मात्र, तिथपर्यंत तोंडातून हात पोहचणे शक्य नव्हते. मग स्नाऊ हलके होण्याचे इंजेक्शन दिले. अन्ननलिका हलकी झाल्यावर मानेजवळ चोळून आत अडकलेली वस्तू तोंडाकडे ढकलण्याचे प्रयत्न झाले. पंधऱा वीस मिनिटांत ती घशापर्यंत आणण्यात यश आले.

- Advertisement -

डॉक्टरांनी लढवली युक्ती

गायीची प्रकृती बिघडल्यामुळे ती स्वत:हून काही करू शकत नव्हती. गायीच्या तोंडात हात घातला तर दाताखाली येण्याची शक्यता होती म्हणून डॉक्टरांनी एक युक्ती लढवली. एक पीव्हीसी पाईपचा तुकडा घेऊन तो आधी जबड्यात बसविला आणि त्यातून मग आत हात घातला. घशात अडकलेले गाजराचे तुकडे बाहेर काढले. तिची अन्ननलिका मोकळा झाली. मध्येच अडकलेला चारा बाहेर पडला, एक दोन मिनिटातच फुगलेले पोटही पूर्ववत झाले.


हे ही वाचा – लॉकडाऊनमुळे रक्तपेढ्याना भासु शकतो रक्ताचा तुटवडा !

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -