Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र शेतकऱ्याच्या मुलानं दिलेल्या लोणचं-भाकरीवर उद्धव ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...

शेतकऱ्याच्या मुलानं दिलेल्या लोणचं-भाकरीवर उद्धव ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले…

Subscribe

उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे, असा धीर दिला. तसंच, एका शेतकऱ्याच्या मुलानं उद्धव ठाकरेंनी लोणचं-भाकरीची शिदोरी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भावनिक प्रतिक्रिया दिली, सोबतच त्याच्याशी संवादही साधला.

उद्धव ठाकरे सध्या अहमदनगर येथे दुष्काळी भागाची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी शेतीसंबंधी अनेक समस्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे, असा धीर दिला. तसंच, एका शेतकऱ्याच्या मुलानं उद्धव ठाकरेंनी लोणचं-भाकरीची शिदोरी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भावनिक प्रतिक्रिया दिली, सोबतच त्याच्याशी संवादही साधला. (Ahmednagar Daura Uddhav Thackeray s emotional reaction to the Shidori given by the farmer s son said)

राज्यात झालेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे बांधावर गेले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आमच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं शेतकरी यावेळी म्हणाले. याचदरम्यान एका शेतकऱ्याचा लहान मुलगा आला. त्यानं उद्धव ठाकरेंच्या हातात कापडात बांधलेली शिदोरी दिली. यात लोणचं, भाकर व ठेचा असल्याचं या मुलानं सांगितलं. तेव्हा, अरे बाळा, तू माझ्यासाठी शिदोरी आणलीस, पण तू काही खाल्लंस का? तू जेवलास का? की स्वत: न जेवता मला शिदोरी देतोयस? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी या मुलाला केली. यावर आपण जेवल्याचं त्यानं सांगितलं. मी हे घेऊन जातो, मी खाईन हे, असं म्हणून उद्धव ठाकरेंनी ती शिदोरी आपल्याजवळ ठेवून घेतली.

- Advertisement -

याच संदर्भात माध्यमांशी बोलताना, उद्धव ठाकरे म्हणाले की, हे प्रेम आहे त्यांच. हीच आमची शिदोरी आहे. हेच आमचे आशीर्वाद आहेत. मला बोलण्यासाठी शब्द नाहीत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा: नाव बदलण्यासाठी 14 हजार कोटींचा खर्च न करता सरसकट कर्जमाफी करा; सुळे यांचा केंद्राला सल्ला )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -