घरमहाराष्ट्रगुगळे यांच्या बायोगॅस प्रकल्पाला मिळणार भारत सरकारचे पेटटं

गुगळे यांच्या बायोगॅस प्रकल्पाला मिळणार भारत सरकारचे पेटटं

Subscribe

अहमनगर शहरातील एका शिक्षकांनी घरघुती बायोगॅस प्रकल्पााची निर्मीती केली आहे. यामुळे अहमनगर शहराने केलेल्या आगळ्यावेगळ्या बायोगॅस सयंत्राची नुकतीच देशपातळीवर नोंद झाली आहे.

अहमनगर शहरातील एका रहिवाशांनी बांधलेल्या नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक बांबू हाऊसमधील आगळ्यावेगळ्या बायोगॅस सयंत्राची नुकतीच देशपातळीवर नोंद झाली आहे. सतीश गुगळे असे या रहिवाशाचे नाव असून ते भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुगळे या शिक्षकांनी बांधलेल्या पर्यावरणपूरक बांबू हाऊसमधील आगळ्यावेगळ्या बायोगॅस सयंत्राची नुकतीच देशपातळीवर नोंद झाली आहे. गुगळे यांच्या या इको फ्रेंडली बायोगॅसमुळे अहमदनगर शहराची मान देखील उंचावली आहे.

ओल्या कचर्‍यापासून केली इंधन निर्मीती

अहमनगरचे प्रयोगशील आर्किटेक्ट राजेंद्र कावरे यांच्या दीर्घ अभ्यास आणि मार्गदर्शनातून या प्रकल्पाची नुकतीच नोंद करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर उभारलेल्या इको-फ्रेंडली सेफ्टी टँक आणि बायोगॅस निर्मिती या इंधन बचत करणाऱ्या प्रयोग प्रकल्पाला नुकतेच भारत सरकारचे पेटंट प्रमाणपत्र मिळाले आहे. सन २०१२ साली सुरू झालेल्या या प्रकल्पामुळे ओल्या कचर्‍यापासून जागेवरच इंधन निर्मिती केली जाते. मागील सहा वर्षात जवळपास २२ टन ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून सहजपणे ३६०० तास चालणार्‍या घरगुती गॅसची निर्मिती करण्यात आली आहे.

- Advertisement -

एलपीजी गॅसची होणार बचत

या प्रकल्पामुळे घरगुती इंधनाच्या एलपीजी गॅस वापरावर ४० टक्के पर्यंत बचत होऊ शकणार आहे. त्याचबरोबर गावातील आणि परिसरातील नागरिकांद्वारे इतरत्र बाहेर टाकला जाणारा ओला कचरा म्हणजेच घरातील उर्वरित शिळे अन्नपदार्थ, भाज्यांचे उर्वरित अवशेष, फळे, फळांच्या साली आणि मानवी टाकाऊ पदार्थ या सर्वांचे विघटन करून मिथेन गॅसची निर्मिती करणे शक्य झाले आहे. ओल्या कटऱ्यामुळे होणारे प्रदूषण, दुर्गंधी आणि रोगराई कमी करण्यास सदर प्रकल्पामुळे निश्‍चितच मदत होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाचा खरा उद्देश यशस्वी होताना दिसत आहे. म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण समितीने देखील या प्रकल्पाची पाहणी करून सतीश गुगळे आणि राजेंद्र कावरे यांचे कौतुक केले. या प्रकल्पाच्या यशाबद्दल सतीश गुगळे आणि राजेंद्र कावरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या प्रभागाचे नगरसेवक गणेश भोसले, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मोलाची साथ दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -