घरमहाराष्ट्रLive Result अहमदनगर महापालिका: शिवसेनेला २२ जागा

Live Result अहमदनगर महापालिका: शिवसेनेला २२ जागा

Subscribe

अहमदनगरमध्ये शिवसेनेनं २२ जागा जिंकल्या असून भाजपला केवळ १४ जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा ३५ हा जादुई आकडा गाठण्यामध्ये कोणत्याही पक्षाला यश आलेलं नाही.

अहमदनगर महानगर पालिकेची त्रिशंकू परिस्थितीकडे वाटचाल, भाजप-१४, शिवसेना-२४ तर राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला २३ जागांवर आघाडी, मनसे-बसपा-अपक्षांना भोपळा


अहमदनगरमध्ये शिवसेनेनं २२ जागा जिंकल्या असून भाजपला केवळ १४ जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा ३५ हा जादुई आकडा गाठण्यामध्ये कोणत्याही पक्षाला यश आलेलं नाही. तर काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला २५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापण्यासाठी आता शिवसेना – भाजपला युती करावी लागणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. धुळ्यात भाजपला एकहाती सत्ता मिळाली असली तरी अहमदनदरमध्ये मात्र भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारा अहमदनगर महापालिकेचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम हा यावेळच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होता. मात्र तो पिछाडीवर आहे. मतदारांनी छिंदमला नाकारल्याचे चित्र दिसत आहे.


अहमदनगर महापालिकेत बहुमतासाठी ३५ जागांची गरज आहे. मात्र सध्याच्या आकडेवारीवरुन तरी भाजप-शिवसेना ३८ जागी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी पिछाडीवर असून केवळ २२ जागी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

अहमदनगर मधील ४० जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये भाजची १६ जागांवर तर शिवसेना १० जागी आघाडीवर आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी १४ जागांवर पुढे आहे.


अहमदनगर महापालिकेच्या ६८ जागांसाठी काल ६७ टक्के मतदान झाले आहे. अहमनगर महापालिका गठित झाल्यानंतरची ही चौथी निवडणूक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या तीन पक्षांमध्ये इथे चुरस पाहायला मिळत आहे. ६८ जागांसाठी एकूण ३३९ मतदार रिंगणात आहेत. अहमदनगर महापालिकेच्या रिंगणात अनेक उमेदवार हे प्रस्थापित नेत्यांच्या घरातीलच आहेत. त्यामुळे घराणेशाहीचे चित्र एकप्रकारे या निवडणुकीत दिसत आहे. भाजपचा माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम हा सुद्धा अपक्ष म्हणून या निवडणुकीत उतरलेला आहे. छिंदमच्या भावाने EVM मशीनची पुजा करुन मतदान केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

अहमदनगर महापालिका – ६८ जागा

भाजप – १४

शिवसेना – २२

काँग्रेस – राष्ट्रवादी – २५

मनसे – ००

इतर – ०७

बहुमताचा आकडा – ३५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -