घरमहाराष्ट्रअहमदनगरचे नाव होणार अहिल्यादेवीनगर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

अहमदनगरचे नाव होणार अहिल्यादेवीनगर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Subscribe

 

अहमदनगरः अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी होळकरनगर करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान चौंडी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यानंतर अहमदनगरचे नामांतर होणार आहे.

- Advertisement -

अहिल्यादेवी होळकर यांचं माहेरचं आडनाव शिंदे आहे. मी पण शिंदेच आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी करावे, अशी मागणी राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर यांनी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही तीच ईच्छा होती. त्यामुळे आम्ही अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकरनगर करत आहोत. तसा निर्णयच राज्य शासनाने घेतला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहिर केले.

हेही वाचाःवीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी अहिल्यादेवी-क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे पुतळे हटवले, ‘हे महाराष्ट्र शासनाला शोभते का?’

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अहिल्यादेवींचे कर्तृत्व हिमालयाएवढं आहे. त्यांचाच आदर्श ठेवून आम्ही करत आहोत. त्यामुळेच आम्ही अहमदनगर जिल्ह्याच नाव बदलून अहिल्यादेवीनगर करत आहोत.

पडळकरांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले होते पत्र

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यासंदर्भात पत्र लिहिले होते. हिंदू राजमाता पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे भारताचं प्रेरणास्थान आहे. हिंदुस्थान मुस्लिम राजवटीत हिंदूसंस्कृती, मंदिरं लुटली आणि तोडली जात असताना अहिल्यादेवींनी हिंदू संस्कृतीत प्राण फुंकले, तसेच त्यांचा जीर्णोद्धार केलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झालेल्या अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे, अशी अहिल्याप्रेमींची लोकभावना असल्याचं गोपीचंद पडळकरांनी पत्रात म्हटले होते.

धनगर समाज संघर्ष समितीने केली होती मागणी

अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा यामागणीसाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समिती (ठाणे) तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या‎ गावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी‎ होळकर यांचा जन्म झाला. सीना‎ नदी काठी वसलेल्या या गावात‎ धनगर समाजाचे दैवतांचा जन्म‎ झाल्याने ती भूमी पवित्र झाली आहे. त्यामुळे अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  यांचे जन्मगाव चौंडी येथुन आहिल्या नगर नामांतरसाठी रथयात्रा काढण्यात आली होती.

औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर अडकले न्यायालयात

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराविरोधात दाखल झालेल्या याचिकेचा निकाल लागेपर्यंत संभाजीनगर व धाराशीव नाव सरकारी दफ्तरी वापरले जाणार नाही, अशी हमी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी राज्य शासनाच्यावतीने उच्च न्यायालयात दिली आहे. औरंगाबाद जिलह्याचे संभाजीनगर नामांतर करण्याचा निर्णय सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत २९ जून २०२२ रोजी मंजूर केला होता. हा निर्णय घेतल्यावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकराने उद्धव ठाकरेंचा निर्णय रद्द करून औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्याचा निर्णय घेतला. पुढे हा प्रस्ताव केंद्रकाकडे पाठवण्यात आला आहे. केंद्राने मंजूरी दिल्यानतंर १७ जुलै २०२२ रोजी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने अधिसूचना काढून औरंगाबाद जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गावाचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नामांतर ‘धाराशीव’ असे करण्यात आले. त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.

औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरावर भालचंद्र नेमाडेंनी केली होती टीका

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावे बदलून काही साध्य होणार नाही. औरंगाबादला पाणी द्या, तिथे चांगली झाडे लावा. मुळात शहरांची नावे बदलणारी लोकं शुद्र आहेत, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले होते. शहारांची नावे बदलून काही साध्य होणार नाही. हडप्पा आणि मोहंजोदाडो संस्कृती जशी नष्ट होत गेली. तसा आता आपल्या संस्कृतीचा अंत सुरु झाला आहे. भारतात लोकशाही धोक्यात आली आहे. सत्य बोलणाऱ्याला पोलीस संरक्षण घेऊन फिरावे लागत आहे. राष्ट्र आणि धर्म या संकल्पना नष्ट झाल्या पाहिजेत, असा टोलाही नेमाडे यांनी यावेळी लगावला होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -