घरमहाराष्ट्रतब्बल ८० म्हशींचा सांभाळ करते आत्मनिर्भर श्रद्धा; दरमहा कमावते ६ लाख रूपये

तब्बल ८० म्हशींचा सांभाळ करते आत्मनिर्भर श्रद्धा; दरमहा कमावते ६ लाख रूपये

Subscribe

पारनेर तालुक्यातील निघोजच्या आत्मनिर्भर श्रद्धा ढवणने समाजातील तरूणांसमोर अनोखा आदर्श

घरातील वंश पुढे चालावा किंवा घरातील कर्त्या पुरूषाची जबाबदारी सांभाळण्यासाठी मुलगा हवा असा अट्टहास कित्येक घरात असतो. मात्र हल्लीच्या जमान्यात मुलगा किंवा मुलगी असा भेद होताना दिसत नाही. यासह अमूक एखादं काम मुलाचं किंवा ठराविक काम मुलीचं असं काहीही राहिलेलं दिसत नाही. आजही समाजात कित्येक ठिकाणी कुटुंबात मुलीला दुय्यम स्थान दिलं जातं. परंतु अहमदनगर येथील पारनेर तालुक्यातील निघोजच्या आत्मनिर्भर श्रद्धा ढवणने समाजातील तरूणांसमोर अनोखा आदर्श ठेवला आहे.

लहान गावात राहणाऱ्या मुली साधारण घरकामात मदत करणं, शेतातील कामं करणं हेच आपल्या समोर येतं मात्र अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील या २०-२१ वर्षीय तरूणीने स्वतःचे शिक्षण घेत १ नाही २ नाही तर तब्बल ८० म्हशींचा सांभाळ करून कुटुंबाला हातभार लावला आहे. श्रद्धा ढवण असं या तरुणीचं नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील निघोज येथे राहणारी श्रद्धा मुलीकादेवी महाविद्यालयात श्रद्धा TYBSc मध्ये शिक्षण घेत आहे.

- Advertisement -

घरात तिच्यासह तीन भावंडं, यामध्ये तीच घरातील मोठी. तिचे वडील अपंग असल्याने तिच्यावर घरातील आर्थिक भार होता. लहान बहिण पुण्यात शिक्षण घेत होती तर लहानगा भाऊ इयत्ता १० वीत शिकत होता. तिच्या वडिलांकडे आता तब्बल ८० म्हशी आहेत . त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं हे त्यांच्याच हातात होतं. वडिलांनंतर घरात थोरली म्हणून घराचा आर्थिक गाडा तिलाच चालवायचा होता. सुरूवातीला घरी असलेल्या ४ म्हशींचा सांभाळ श्रद्धाने यशस्वीपणे केला आणि सध्या ती तब्बल ८० म्हशींचा सांभाळ करते. या म्हशींच्या संगोपणासाठी तिने घराजवळ म्हशींसाठी २ मजली गोठा बांधला. म्हशींसाठी बांधला जाणारा २ मजली गोठा हा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम होता.

मंजुरांच्या मदतीने ती दुग्ध व्यवसाय करते. विशेष म्हणजे ती पहाटे लवकर उठून ती गोठा साफ करणं, म्हशी धुणं. त्यांचं दुध काढणं. आणि त्यानंतर स्वतः ते दूध डेअरीवर नेणं ही सर्व कामं श्रद्धा करत असून मजुरांच्या मदतीने ती दुग्ध व्यवसाय करते. यामुळे श्रद्धा दरमहा ६ लाख रूपये कमावते. पुरूषाप्रमाणे मोटार सायकल चालवून त्यावरून दूध घालणे यासह चारचाकी वाहन हाकत जनावरांना बाजारातून चारा देखील ती आणते. इतकेच नव्हे तर म्हशींसाठी पेंड किंवा म्हशीचे खाद्य घेऊन येणे आणि म्हशीला खाऊ घालणे ही सर्व कामे करून संध्याकाळी अभ्यास करणे असा श्रद्धाचा रोजचा दिनक्रम आहे. स्वतःचे शिक्षण करून आपल्या घराला हातभार लावत असल्यामुळे तिच्या घरच्यांना श्रद्धाचा अभिमान आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -