घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनगर जिल्ह्याला पुन्हा गारपिटीचा तडाखा

नगर जिल्ह्याला पुन्हा गारपिटीचा तडाखा

Subscribe

पुढील दोन दिवस धोक्याचे , हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा

अहमदनगर : जिल्हयातील श्रीरामपूर नेवासा आणि वैजापुर तालुक्यांना मंगळवारी(दि.28)दुपारच्या सुमारास अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. काढणीला आलेल्या द्राक्ष, कांदा, हरबरा गहू त्याचबरोबर द्राक्ष बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

भारतीय हवामान विभागाच्या वतीने (दि.२८) आणि उद्या (दि.२९) मध्य-महाराष्ट्र,विदर्भ आणि माराठवाड्यातील काही जिल्ह्यांन ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट जारी केला होता. हवामान विभागच्या वतीने देण्यात आलेला अंदाज खरा ठरत नगर बरोबरच औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर येथेही वीजांच्या कडकडाटासह अवकळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने पुन्हा एकदा बळीराजा संकटात सापडला आहे.

- Advertisement -

दोन दिवस धोक्याचे…

हवामान विभागाच्या वतीने नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला आहे तर चंद्रपूरला यलो अलर्ट देण्यात आला असून. नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना, औरंगबाद जिल्ह्यात देखील वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो त्यामुळे पुढील दोन दिवस शेतकऱ्यांसाठी धोक्याचे ठरणार आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -