घरमहाराष्ट्रएड्स समुपदेशन केंद्राला टाळे

एड्स समुपदेशन केंद्राला टाळे

Subscribe

एचओसी प्रशासनाविरोधात नाराजी

श्री समर्थ सामाजिक संस्थेतर्फे येथे चालविण्यात येणार्‍या एड्स समुपदेशन व आधार केंद्राला एचओसी (हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स) कंपनीच्या प्रशासनाने टाळे ठोकल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.या परिसरातील एड्सचे वाढते प्रमाण नियंत्रणात रहावे या उद्देशाने गेली दहा वर्षे एचओसीच्या बंगला क्र. सीटी 4 येथे संस्था हे केंद्र चालवित आहे. आतापर्यंत स्थानिक, तसेच कर्जत, खालापूर, पनवेल, उरण तालुक्यातील शेकडो एड्स रुग्णांत या केंद्राने समुपदेशनद्वारे आनंदी जीवन जगण्याची उमेद निर्माण करून त्यांना औषधोपचार केले आहेत. कंपनीकडून 2010 साली ही जागा भाडेतत्वावर घेण्यात आली आहे. आतापर्यंतचे सर्व भाडे चुकते करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाने कोणतीही सूचना न देता केंद्राच्या इमारतीला टाळे ठोकून तेथील फलकही उखडून टाकला आहे.

वापरत असलेल्या जागेत जोपर्यंत अन्य काही होत नाही तोपर्यंत हे केंद्र सुरू ठेवण्याबाबत अनेकदा मिनतवार्‍या करण्यात आल्या आहेत. शिवाय आ. प्रशांत ठाकूर, आ. मनोहर भोईर, आ. सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती उमा मुंढे आदींनी प्रशासनाला पत्र दिले आंहे. केंद्र सुरू ठेवण्याची विनंती केली आहे. याशिवाय वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतही याबाबत ठराव करण्यात आला आहे. हे सर्व पत्रव्यवहार कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भिडे यांच्यापर्यंत पोहचूनसुद्धा 16 जुलै रोजी केंद्राला टाळे ठोकण्याचे काम प्रशासनाने केले आहे.

- Advertisement -

या आधी काही संस्थांना कंपनीने शैक्षणिक कामाकरिता जागा दिली आहे. परंतु आम्ही संस्थेचे पदाधिकारी कोणतेही मानधन न घेता निःस्वार्थ भावनेने काम करूनही प्रशासनाने असे टोकाचे पाऊल उचलणे वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष अरविंद पाटील यांनी व्यक्त केली. आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले; तर दुसरीकडे आम्ही सर्व जागा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनकडे हस्तांतरित केली आहे. त्यामुळे त्या मोकळ्या करून दिल्या जात असल्याचे एचओसीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -