घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रएड्स दिन : सात वर्षांत 472 बालकांना ‘एचआयव्ही’मुक्त आयुष्याचे दान

एड्स दिन : सात वर्षांत 472 बालकांना ‘एचआयव्ही’मुक्त आयुष्याचे दान

Subscribe

नाशिक : एचआयव्हीबाबत जनजागृती, समुपदेशन सातत्याने सुरु असल्याने नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. २०१6 ते ऑक्टोबर २०२२ या सात वर्षांच्या कालावधीत बाधित गरोदर मातांच्या 492 बालकांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. त्यापैकी 4७2 बालके एचआयव्हीमुक्त आढळून आले, तर 20 बालकांनाच एचआयव्हीचे संक्रमण झाल्याचे आढळून आले.

एचआयव्ही संक्रमण झालेल्या रुग्णांना समाजात सन्मानाची वागणूक मिळणे कठीण असते. समाज त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत असतो. मद्य आणि संकोचामुळे एचआयव्हीबाधित रुग्णांचे मनोबल आणखी खचते. या पार्श्वभूमीवर एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठी आणि या रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी एड्स दिन साजरा केला जातो. जिल्हा रुग्णालयात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक कार्यरत आहे.

- Advertisement -

सात वर्षांत जिल्ह्यात 492 एचआयव्ही बाधित गरोदर महिलांवर ‘एआरटी’ उपचार पद्धतींद्वारे वैद्यकीय उपचार करण्यात आले. एआरटी उपचार घेतलेल्या गरोदर मातांपैकी तब्बल 472 गरोदर मातांनी एचआयव्हीमुक्त बाळांना जन्म दिला. तर, केवळ 20 मातंकडून त्यांच्या बाळांना एचआयव्ही संक्रमण झाले. एचआयव्ही जनजागृतीसाठी जिल्ह्यात १ डिसेंबर रोजी जनजागृती फेरी, पोस्टर स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेतली जाणार आहे.

एड्सबाबत जनजागृती आणि नागरिक जागरुक झाल्याने भारतात मृत्यूदर ८३ टक्क्याने घटला आहे. गर्भवती महिलांची विशेष काळजी घेतली जात असल्याने बालकांना एचआयव्ही संक्रमण झाले नाही. : डॉ. अशोक थोरात, सिव्हिल सर्जन, सिव्हिल रुग्णालय

प्रत्येक गरोदर मातेने पहिल्या तीन महिन्यात एचआयव्ही तपासणी करुन घ्यावी. जर, गरोदर माता बाधित आढळून आली तर मुलाला एचआयव्हीपासून वाचवता येते. नाशिक जिल्ह्यात प्रायमरी हेल्थ केअर, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात एचआयव्हीची मोफत तपासणी व मोफत औषधोपचार केले जातात. : योगेश परदेशी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -