घरअर्थजगतप्रत्येक झोपडपट्टीधारकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवा, राज्यपालांची बिल्डर्सना आवाहन

प्रत्येक झोपडपट्टीधारकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवा, राज्यपालांची बिल्डर्सना आवाहन

Subscribe

मुंबई : गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन आगामी दोन ते तीन वर्षांमध्ये मुंबईत कुणीही झोपडपट्टीत राहणार नाही, या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बांधकाम व्यावसायिकांना केले. सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी आपला नफा कमीत कमी ठेवावा, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

- Advertisement -

वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या ’30व्या प्रॉपर्टी एक्स्पो’ या फ्लॅट्स व गृहविक्री प्रदर्शनाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. गृहविक्री प्रदर्शनाचे आयोजन क्रेडाई – महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीने केले होते. मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांनी आयोजित केलेल्या भव्य गृह विक्री प्रदर्शनामुळे घर खरेदी करण्यास इच्छुक असलेले ग्राहक विनाविलंब घर घेण्यास उद्युक्त होतील, असे राज्यपालांनी सांगितले.

गृहनिर्माण बांधकाम व्यवसायामुळे किमान 250 छोट्या-मोठ्या उद्योगांना चालना मिळते, अनेक लोकांना रोजगार मिळतो तसेच, शासनाला देखील महसुली उत्पन्न मिळते. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्र अनेक उद्योगांचा कणा असल्याचे क्रेडाई – एमसीएचआयचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी सांगितले.

- Advertisement -

यावेळी राज्यपालांनी प्रदर्शनातील विविध बांधकाम व्यावसायिकांच्या दालनाला भेट दिली. राज्यात फ्लॅट तसेच घराच्या नोंदणीसाठी ई-नोंदणीची सुविधा सुरू केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते यावेळी नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रेडाई -एमसीएचआय संस्थेचे पदाधिकारी व बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.

आठ राजदूत व उच्चायुक्तांची भेट
विविध देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ राजदूत व उच्चायुक्तांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांना आपल्या कार्याची तसेच संबंधित राष्ट्रांचे भारतासोबतचे संबंध, उभय देशांतील व्यापार आणि सांस्कृतिक संबंध यासह इतर मुद्द्यांची माहिती दिली. गुजरातमधील केवडिया येथे होणाऱ्या 10व्या मिशन प्रमुखांच्या परिषदेचा भाग म्हणून राजदूत महाराष्ट्राला भेट देत आहेत.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -