घर क्राइम IAF अधिकारी निखिल शेंडे अडकला पाकच्या जाळ्यात; ATS ची पुणे न्यायालयात माहिती

IAF अधिकारी निखिल शेंडे अडकला पाकच्या जाळ्यात; ATS ची पुणे न्यायालयात माहिती

Subscribe

 

पुणेः DRDO या संस्थेत काम करणारे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरूलकर यांच्यासोबत हवाई दलाचे IAF अधिकारी निखिल शेंडे हेही पाकिस्तानच्या जाळ्यात अडकल्याची माहिती दहतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी पुणे विशेष न्यायालयात दिली. शेंडे हे बंगळुरूमध्ये कार्यरत आहेत. अजून एक उच्च पदस्थ अधिकारी पाकच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

डॉ. कुरुलकर यांची कोठडी संपल्याने त्यांना एटीएसने विशेष सत्र न्यायालयात हजर केले. डॉ. कुरुलकर यांचा नोंदवण्यात आलेला जबाब एटीएसने पुणे न्यायालयत सादर केला. त्यात शेंडेंबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेंडे यांना अद्याप आरोप करण्यात आलेले नाही. त्यांची स्वतंत्र चौकशी सुरु आहे. डॉ. कुरुलकर यांना पाकिस्तानातून ज्या IP address वरुन संपर्क केला जात होता. त्याच IP address द्वारे शेंडे यांच्याशी संपर्क केला जात होता. डॉ. कुरुलकर यांच्याप्रमाणेच शेंडे यांना पाकिस्तानने आपल्या जाळ्यात अडकवले होते. शेंडे यांच्याही सोशल मीडियाचा वापर केला जात होता, अशी माहिती एटीएसने न्यायालयात दिली.

याआधी honey trap प्रकरणी डॉ. कुरुलकर यांना एटीएसने अटक केली.  यांच्या सोशल मीडियातून फोटो, व्हिडिओ आणि फाईल्स् शेअर झाल्या आहेत. त्यांच्या मोबाईल आणि अन्य डिव्हाइसमधून डिलिट झालेला डेटा फॉरेन्सिक लॅबकडून पुन्हा प्राप्त झाला आहे. परदेश दौऱ्यावर असताना डॉ. कुरुलकर सहा देशात गेले होते, अशी धक्कादायक माहिती एटीएसच्या तपासात समोर आली होती. हवाई दलाचे अधिकारी शेंडे यांचे नावही डॉ. कुरुलकर यांच्या चौकशीत समोर आले होते.

- Advertisement -

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांची छायाचित्रे वापरून या अधिकाऱ्याला पाकिस्तानने आपल्या जाळ्यात ओढले. यानंतर ते पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आले. ते पाकिस्तान गुप्तचर संस्थेतील एका महिलेच्या संपर्कात देखील होते, अशी माहिती समोर आली आहे.  त्यांनी व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअप कॉलिंग आणि व्हॉट्सअपच्या व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना माहिती पुरवली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून डीआरडीओच्या दक्षता विभागाकडून आणि गुप्तचर पथकांकडून डॉ. कुरूलकर यांच्यावर नजर ठेवून होते. अखेरीस याबाबतची संपूर्ण माहिती पुराव्यानिशी मिळाल्यानंतर आणि DRDO मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर ATSने अधिकृत गुप्त कायद्यांतर्गत आरोपी डॉ. कुरूलकर यांना अटक केली.

 

- Advertisment -